
पुणे : न्यायालयाचे कामकाज एक तासाने केली कमी
पुणे : शहरातील कोरोना (Corona)रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरवात झाल्याने पुणे जिल्हा न्यायालयातील(PUNE DISTRICT COURT) सुनावणीचे कामकाज दोन शिफ्टमध्ये सुरू करण्यात आले आहे. कामाची वेळ एक तासाने कमी करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार आता सुनावणीचे कामकाज सकाळी ११ ते दुपारी दोन आणि दुपारी दोन ते चार अशा दोन शिफ्टमध्ये चालू राहील.
हेही वाचा: पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये एकदाच पैसे भरा, दर महिन्याला मिळवा व्याज
सध्या सकाळी ११ ते पाच अशी सुनावणी सुरू आहे. सोमवारपासून (ता.१०) या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. न्यायालयीन प्रशासनाचे कामकाज सकाळी साडेदहा ते दुपारी साडेचार दरम्यान होणार आहे. या काळात ५० टक्के कर्मचारी रोटेशन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत. दोन शिफ्टमध्ये साक्ष नोंदविणे, युक्तिवाद ऐकणे, केवळ तडजोडीसाठी हजर राहणे असे कामकाज होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे महाव्यवस्थापक एम. डब्लू. चंदनानी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. पहिल्या शिफ्टमध्ये पुरावा व दुसऱ्या शिफ्टमध्ये युक्तिवाद व आदेश पारित केले जाणार आहेत. तसेच वकील व पक्षकार गैरहजर असतील तर विरुद्ध आदेश पारित करू नयेत, असे या आदेशात नमूद आहे.
हेही वाचा: महावितरणतर्फे ‘एक दिवस एक गाव’ला सुरुवात
जिल्हा न्यायालयातील कॅन्टीनमध्ये केवळ पार्सल सुविधा सुरू राहणार आहे. कोर्टबोर्डवर उल्लेख असलेल्या कामांमधील वकील व साक्षीदार, आरोपी यांनाच फक्त न्यायालयाच्या इमारतीमध्ये प्रवेश देण्यात येर्इल. कामकाज संपल्यानंतर त्वरित न्यायालयाच्या आवाराबाहेर जाणे बंधन करण्यात आले आहे. तसेच न्यायालयाच्या आवारात मास्क लावणे. शारीरिक अंतर ठेवणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे अत्यावश्यक आहे, असे पुणे बार असोसिएशनकडून (पीबीए) सांगण्यात आले.
हेही वाचा: ‘सर्वांसाठी घरं’ उपक्रम प्राधान्याने राबविणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे जिल्हा न्यायालयातील १०० टक्के वकीलांनी कोरोनावरील पहिली लस घेतली आहे. तर दुसरी लस घेतलेल्या वकिलांचे प्रमाण सुमारे ८० टक्के आहे. उर्वरित वकिलांनी लवकरात लवकर लसीकरण(Vaccination) करून घ्यावे, असे आवाहन त्यांना करण्यात आले आहे. नियमांचे पालन करून आरोग्याबाबत दक्षता घेत न्यायालयीन कामकाज करावे, अशी विनंती वकिलांना करण्यात आली आहे.
- ॲड. सचिन हिंगणेकर, उपाध्यक्ष, पुणे बार असोसिएशन
Web Title: Court Proceeded Time Is Less Than An Hour
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..