esakal | पुणे : कोर्टाची कामे पडणार लांबणीवर; काय आहे कारण?
sakal

बोलून बातमी शोधा

Court

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि खडकी कॉन्टोन्मेंट हद्दतील न्यायालयाचे कामकाज 11 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत सुरू आहे.

पुणे : कोर्टाची कामे पडणार लांबणीवर; काय आहे कारण?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अनलॉक सुरू झाल्यापासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील न्यायालयीन कामकाजाबाबत लागू करण्यात आलेली काही बंधने 11 जानेवारीपर्यंत कायम असणार आहेत. त्यामुळे यापुढेही दोन्ही शहरातील न्यायालयांचे कामकाज तत्काळ आणि महत्त्वाच्या दाव्यांसाठी सकाळी 11 ते दुपारी दोन अशा एकाच शिफ्टमध्ये सुरू राहणार आहे.

2021ला पृथ्वी होणार नष्ट; नॉस्ट्रेडॅमसची भविष्यवाणी ठरणार खरी?

न्यायालयात दाखल असलेल्या दाव्यांची पूर्ण क्षमतेने सुनावणी होत नसल्याने अनेक दावे प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे पक्षकारांना न्याय मिळण्यास उशीर होत आहे. तसेच केवळ महत्त्वाच्या प्रकरणांवरच सुनावणी होत असल्याने वकिलांना फीद्वारे मिळणारे उत्पन्न देखील थांबले आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता न्यायालयीन कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र त्यासाठी पक्षकार आणि वकिलांना आता आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. न्यायालयीन कामकाज कशा पद्धतीने सुरू ठेवावे, याबाबत कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा आणि वकिलांकडून घेतलेल्या कौलनुसार न्यायालयीन कामकाज आहे त्याच स्थितीच सुरू ठेवण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये देखील घेण्यात आला होता.

न्यूमोनियावर आली पहिली स्वदेशी लस; सिरमच्या 'न्यूमोसिल'चे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि खडकी कॉन्टोन्मेंट हद्दतील न्यायालयाचे कामकाज 11 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी काढलेल्या परिपत्रकानुसार या काळात सुनावणी होईल, असे येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश नीरज धोटे यांनी काढलेल्या आदेशात नमूद आहे.

सर्वाधिक परिणाम दिवाणी दाव्यांवर :
न्यायालयाचे कामकाज नियमित न झाल्याने दाव्यांच्या सुनावणीला होत असलेला विलंब कायम राहणार आहे. याचा सर्वाधिक परिमाण दिवाणी दाव्यांवर होत आहे. तर पूर्ण क्षमतेने सुनावणी होत नसल्याने त्यावर अवलंबून असलेल्या वकिलांच्या प्रॅक्‍टिसला फटका बसणार आहे.

Govt Jobs: दहावी पास तरुण-तरुणींसाठी नोकरीची संधी; पोस्टात होणार भरती!

नियमित सुनावणी होत असल्याने तरुण वकील आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे या सर्वांचे म्हणणे आहे की, नियमित कामकाज सुरू करावे. दिवाळीनंतर कामाची वेळ टप्प्याटप्याने वाढविण्यात यावी अशी आमची मागणी होती. कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी न्यायालयीन परिसरात खबरदारी घेण्यात येत आहे.
- ऍड. सचिन हिंगणेकर, उपाध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image