

Police officials investigating the crime scene in Haveli taluka after a land dispute murder case surfaced.
sakal
उरुळी कांचन: जमिनीच्या वादातून चुलत भावानेच दुचाकीला मोटारीने धडक देऊन भावाचा खून केल्याची घटना भवरापूर (ता. हवेली) येथे घडली. सोमवारी (ता. २) सायंकाळी साठे वस्तीजवळ झालेल्या या घटनेत महेश लक्ष्मण साठे (वय ३४) यांचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दरम्यान, हा अपघात नसून जीवे मारण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त होत आहे.