esakal | पुण्यात आज कोव्हॅक्सीनची लस उपलब्‍ध
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात आज कोव्हॅक्सीनची लस उपलब्‍ध

पुण्यात आज कोव्हॅक्सीनची लस उपलब्‍ध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिकेतर्फे उद्या (सोमवारी) फक्त कोव्हॅक्सीन लस सहा केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर ३०० डोस उपलब्ध आहेत. कोव्हीशील्डचा लस साठा संपल्याने शहरातील लसीकरण बंद असणार आहे. शासनाकडून लस उपलब्ध झाल्यास मंगळवारी लसीकरण केले जाईल, असे महापालिका प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा: मानाच्या पालख्यांचे प्रस्थान; महापूजेसाठी मुख्यमंत्री आज पंढरपुरात

- पहिल्या डोससाठी आॅनलाइन बुकिंग केलेल्या नागरिकांसाठी २० टक्के लस

- पहिल्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस

-२० जून पूर्वी पहिला डोस (२८ दिवस) घेतल्याच्या दुसऱ्या डोससाठी ४० टक्के लस आॅनलाइन बुकींगद्वारे उपलब्ध

- दुसऱ्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस उपलब्ध

loading image