मुंबईत नव्हे, पुण्यात आहे, कोरोनाची चिंताजनक स्थिती; एकेका बेडसाठी लागल्या रांगा 

टीम ई-सकाळ
Thursday, 16 July 2020

पुणे शहरात कोरोनाबाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातही वयोवृद्ध, मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा अशा इतर व्याधी असणाऱयां रुग्णांनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे. यापैकी कोरोनाची स्पष्ट लक्षणे दिसणाऱया रुग्णांना उपचारांसाठी दाखल करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

पुणे : कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना एकेका बेडसाठी हॉस्पिटलच्या दारात तासन् तास बसावे लागत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसते. पण, त्यानंतरही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी जागा मिळत नाही. कोरोनाची स्पष्ट लक्षणे दिसत असणाऱ्या रुग्णांनी उपचार घ्यायचा तरी कुठे, असा सवाल आता पुणेकर महापालिका प्रशासनाला विचारत आहेत. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचाण्यासाठी येथे क्लिक करा

आणखी वाचा - लॉकडाउनमध्ये पुणे मेट्रोचा मार्ग पुढं सरकला; वाचा सविस्तर बातमी

शहरात कोरोनाबाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातही वयोवृद्ध, मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा अशा इतर व्याधी असणाऱयां रुग्णांनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे. यापैकी कोरोनाची स्पष्ट लक्षणे दिसणाऱया रुग्णांना उपचारांसाठी दाखल करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पण, यातील बहुतांश रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्याने दाखल करून घेता येत नाही, अशी वस्तूस्थिती सध्या शहरात दिसते. 

हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या रांगा
शहरातील बुधवारी रात्री बारा ते पंधरा कोरोनाबाधी रुग्ण बेड मिळण्याची वाट पहात एका मोठ्या हॉस्पिटलच्या दारात अक्षरशः रांगेत उभे होते. हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात बेड उपलब्ध नाहीतच, पण आँक्सिजनची व्यवस्था असलेल्या बेडही आता मिळत नाहीत. वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये फोन करून विचारल्यानंतर ‘बेड नाही ‘ हे एकच उत्तर रुग्णाच्या नातेवाईकांना मिळत आहे, असे निरीक्षण एका ज्येष्ठ डॉक्टरांनी नोंदविले. 

आणखी वाचा - पाकच्या खेळीला भारत शह देणार? 

फक्त धावा-धाव, शोधा-शोध
कोरोना विषाणूंच्या ससर्गाचे निदान झाल्यानंतर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नातेवाईकांना धावाधाव करावी लागत आहे. पण, त्यानंतरही हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसल्याचे पुणेकरांची चिंता वाढली आहे. त्यामुळे एकेका बेडसाठी रुग्णाचे नातेवाईक शहरातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यासाठी धावा-धाव करत आहेत. शक्य त्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बेड शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल मात्र होता येत नाही, ही भीषण स्थिती सध्या शहरात दिसते, अशी माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली. 

नेमकं काय झालंय?

  • हॉस्पिटलमध्ये आँपरेशन आणि नॉन आँपरेशन बेडस् अशी दोन वर्गवारी करण्यात आली आहे. डायलिसीस, कँन्सर, डे-केअर, लहान मुलांसाठी, प्रसूती या नॉन आँपरेशनल बेडस् आहेत. या वगळून हॉस्पिटलमध्ये शिल्लक राहिलेल्या आँपरेशनल बेडस् प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत.
  • पाचशे बेडस् असलेल्या एकाद्या रुग्णालयांमधून फक्त 150 बेडस् आँपरेशन दाखविण्यात आल्या आहेत. त्यामुळे हॉस्पिटलने जाहिर केलेल्या आँपरेशनल बेडस् पैकी 80 टक्के प्रशासनाने घेतल्या आहेत.
  • अधिग्रहण केलेल्या 80 टक्के बेडस् फक्त कोरोनाबाधीत रुग्णांसाठी नाहीत. त्यावर इतर रुग्णांच्या उपाचारांसाठी खुल्या आहेत. त्याची फि नियंत्रित करण्यात आली आहे.
  • अधिगृहण केलेल्यापैकी 80 टक्के बेडस् कोरोनाबाधीतांसाठीच वापरायच्या अशी सक्ती हॉस्पिटलवर नाही. त्यामुळे इतर आजाराच्या रुग्णांसाठी वापरण्याचा निर्णय हॉस्पिपटलने घ्यायचा आहे. त्या आधारावर अधिग्रहण केलेल्या सर्व बेडस् काही रुग्णालये इतर रुग्णांच्या उपचारांसाठी वापरत आहेत. 

हॉस्पिटलसमोरील समस्या

  • हॉस्पिटलमध्ये बेडस् उपलब्ध आहेत. पण, रुग्णांना दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर नाहीत.
  • कोरोना उद्रेकात बहुसंख्या डॉक्टर हॉस्पिटल सोडून गेले आहेत. त्यामुळे रुग्णालयांकडे निम्मेच मनुष्यबळ शिल्लक राहिले.
  • कोरनाची भीती सर्वांनाच आहे. तशीच ती डॉक्टरांमध्येही दिसते. त्यामुळे हॉस्पिटलमधून काही डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत.
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 situation got worst pune city beds not available for patients