विमाननगर येथे बत्तीशे बेडसह इतर सुविधा असणारे कोविड केअर सेंटर सुरु

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जुलै 2020

पुणे शहरातील सर्व सोयीने उपलब्ध असे बत्तीशे बेडचे कोविड केअर सेंटर विमाननगर येथे सुरु करण्यात आले. 

रामवाडी : पुणे शहरातील सर्व सोयीने उपलब्ध असे बत्तीशे बेडचे कोविड केअर सेंटर विमाननगर येथे सुरु करण्यात आले. आज कोविड केअर सेंटरच्या उदघाटनावेळी उपमहापौर सरस्वती  शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, नगरसेवक योगेश मुळीक, अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप, नगरसेवक राहुल भंडारे, अर्जुन जगताप, महेश गलांडे, नगररोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्य्क आयुक्त राजेश बनकर, कोविड सेंटरचे प्रमुख सुनील यादव उपस्थित होते.

असा चेक करा बारावीचा रिझल्ट

पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . या पार्श्ववभूमीवर विमाननगर येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले. विमाननगर येथील कोविड सेंटरच्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये रुग्णांसाठी आठशे बेडची सुविधा करण्यात आली आहे अशा एकुण चार बिल्डिंग मध्ये बेडची  सुविधा उपलब्ध असणार आहे.

प्रत्येक फ्लॅटमध्ये रुग्णासाठी पाच बेड तसेच बाथरूम टॉयलेटची सुविधा आहे. भारतीय जैन संघटनाचे डॉक्टर सात दिवस चोवीस तास रुग्णांवर उपचारासाठी हजर असणार आहेत. सध्या फेज वनमध्ये  आठशे  बेडची सुविधा सुरु करण्यात आली आहे. कोरोनाचे  सौम्य लक्षणं असलेले रुग्ण तसेच क्वारंटाईन व्यक्ती  हे या ठिकाणी असणार आहेत. बजाजकडून पाॅन्सर करण्यात आले आहे.  इस्कॉनच्या  अन्नआमृत संस्थेमार्फत रुग्णांना जेवणाची सोय केली जाणार आहे. वरील सर्व  माहिती कोविड सेंटरचे प्रमुख सुनील यादव यांनी दिली.

येरवडा कारागृहातून पाच कैदी पळाले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Care Center with 32 beds and other facilities started at Vimannagar