esakal | शिरूर : उरळगावला कोविड केअर सेंटर सुरू

बोलून बातमी शोधा

covid centre

शिरूर : उरळगावला कोविड केअर सेंटर सुरू

sakal_logo
By
अविनाश लोखंडे

रांजणगाव सांडस : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उरळगाव (ता. शिरूर) येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. येथील चंद्रभागा मंगल कार्यालयामध्ये एकूण १२० खाटांचे सर्व सुविधापूर्ण हे सेंटर असणार आहे. कोविड सेंटरमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. तहसीलदार एल .डी. शेख, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार यांच्या हस्ते या सेंटरचे औपचारिक उद्घाटन बुधवारी (ता. २१) करण्यात आले. आमदार अॅड. अशोक पवार, माजी सभापती सुजाता पवार यांनी यासाठी पुढाकार घेतल्याने हे सेंटर सुरू झाले.

हेही वाचा: जुन्नर : वैरणीला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान

पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महसूल विभाग व राव-लक्ष्मी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने येथील चंद्रभागा मंगल कार्यालयात १२० बेडचे सुसज्ज सेंटर साकारले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेतल्याने या सेंटरवर आवश्यक व पुरेसा औषधोपचाराचा साठा, मनुष्यबळ उपलब्ध केल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दामोदर मोरे यांनी दिली. या प्रसंगी गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजी वडघुले, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विकास शिवले, माजी संचालक कांतीलाल होळकर, माजी सरपंच प्रशांत सात्रस, सरपंच सोमनाथ बेंद्रे, शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, डॉ. इंदिरा डॅनियल, बाळासाहेब वागचौरे, अशोक चव्हाण, माजी उपसरपंच राजेंद्र गिरमकर, वाल्मीक सातकर, नानाभाऊ सात्रस, माजी सरपंच संतोष दौंडकर ,अशोक कोळपे, सरपंच सारिका गजानन जांभळकर, नामदेव गिरमकर , ग्रामसेवक निलेश लोंढे राजेंद्र सांत्रस, जया शिरसाट, गोविंद सुरवसे, सरपंच कमल प्रकाश शिवले आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा: प्लाझ्मा तुटवडा रोखण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांना एफडीएचे आदेश

परिसरातील ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणात विविध स्वरूपात मदत केली आहे व पुढील काळातही मदत करणार असल्याचे सांगितले. सुजाता पवार म्हणाल्या, ''न्हावरे, उरळगाव आदी गावांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. उरळगावमध्ये कोविड सेंटरमध्ये शिरूर, हवेली तालुक्यांतील व इतर रुग्णावर उपचार केले जाणार आहे. आवश्यक त्या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रशासनाला सहकार्य करणार आहे. या विभागाबरोबरच समाजातील दानशूर व्यक्तींनी या सेंटरला विविध स्वरूपात मदत करण्याचे, नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करुन आवश्यक ती खबरदारी घ्यावी आवाहन केले.

120 बेडची सोय- चंद्रभागा कार्यालयाच्या वतीने १२० बेडची सोय असलेल्या कार्यालयाच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली ,रुग्णासाठी आंघोळीसाठी गरम पाणी, स्वच्छतागृहाची, विजेची, पंख्याची, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. काही दानशूर मंडळींनी रुग्णांसाठी मोफत वस्तू स्वरुपात मोठ्या प्रमाणात मदत केली तर काहींनी विविध सेवा पुरवण्याची इच्छा व्यक्त केली. कोविड केअर सेंटर साठी स्वतंत्र आरोग्य कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे.