कोरोनाच्या लढाईसाठी बारामती आणखी सज्ज...या आहेत सुविधा 

मिलिंद संगई
Saturday, 16 May 2020

कोरोनाची मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना पुण्याला पाठविण्याची गरज भासणार नाही.

बारामती (पुणे) : कोरोना तपासणी प्रयोगशाळेपाठोपाठ आता बारामती "एमआयडीसी'तील रुई ग्रामीण रुग्णालयात कोविड हेल्थ सेंटर सुरू होत आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील तालुकास्तरावरील हे पहिलेच कोविड हेल्थ सेंटर ठरणार आहे. मंगळवारपासून (ता. 19) हे सेंटर कार्यान्वित होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून या दोन्ही गोष्टी मार्गी लागल्या आहेत. 

नियतीची क्रूर चेष्ठा...चार चिमुकल्यांसमोरच आईवडिल बुडाले...   

या कोविड हेल्थ सेंटरमध्ये पॉझिटिव्ह, परंतु मध्यम स्वरूपाची लक्षणे असणारे रुग्ण या ठिकाणी ठेवले जाणार आहे. ज्यांना एकापेक्षा अधिक स्वरूपाच्या व्याधी उदा. मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग अशा रुग्णांना मात्र पुण्याला हलविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे लोकसहभागातून हे कोविड सेंटर उभारण्यात आले असून, 20 खाटांचा हा विभाग असेल. त्यापैकी 8 खाटा या अतिदक्षता विभागाच्या असतील. मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना त्यामुळे पुण्याला पाठविण्याची गरज भासणार नाही. ही कायमस्वरूपी बारामतीकरांसाठीची सोय या निमित्ताने झाली आहे. 

केंद्राच्या पॅकेजवर अमोल कोल्हे यांची सडकून टीका

कोरोनाची तपासणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होईल; तर मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णाला कोविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, रुई ग्रामीणचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील दराडे यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, संभाजी होळकर, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, तहसीलदार विजय पाटील यांनी या प्रक्रियेत मोलाचा सहभाग दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid Health Center is starting in Baramati