नियतीची क्रूर चेष्टा...चार चिमुकल्यांसमोरच आईवडिल बुडाले कालव्यात... 

drown
drown

लोणी काळभोर (पुणे) : नवीन उजवा मुठा कालव्याच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या आपल्या सात वर्षीय मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईला जीव गमवावा लागला, तर वडिल पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे शनिवारी (ता. 16) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. 
 
कमालच झाली, दौंडच्या 70 वर्षीय ज्येष्ठाने कोरोनाला केला चीतपट...  

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत सोनी कश्‍यप (वय 38, रा. सध्या कुंजीरवाडी, ता. हवेली, मूळगाव गौसगाव जि. हरदोई, उत्तर प्रदेश) यांचा मृत्यू झाला; तर अशोक कश्‍यप (वय 40) हे पाण्यात बुडाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. अशोक व सोनी हे जोडपे उत्तर प्रदेशहून सहा महिन्यांपूर्वी दोन मुली व दोन मुले, अशा चार मुलांना घेऊन कुंजीरवाडी परिसरात कामासाठी आले होते. या जोडप्याला तीन महिन्यांपूर्वी अतुल जवळकर यांच्या कुंजीरवाडी येथील "गौरी नर्सरी'त बिगारी म्हणून कामही मिळाले होते. महिनाभर काम करताच कोरोनाचे कारण दाखवून अशोक यांनी नर्सरीमधील काम थांबवले होते. तसेच, त्यांनी गावी जाण्यासाठी तीनच दिवसांपूर्वी तलाठी कार्यालयात नावही नोंदवले होते. 

दरम्यान, अशोक व सोनी हे दोघेजण काम नसल्याने चारही मुलांना घेऊन शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास नवीन मुठा कालव्यावर आले होते. तीन मुले कालव्याच्या भरावाजवळ खेळत होती. रणजित हा सात वर्षीय मुलगा कालव्यात पोहण्यासाठी उतरला होता. आळंदी म्हातोबाची गावाकडे जाणाऱ्या रस्त्यापासून सोरतापवाडी गावाकडे पाचशे मीटर अंतरावर कालव्यातील पाण्याला वेग मिळावा, यासाठी पाटबंधारे विभागाने कालव्याच्या रुंदी दगडी बांधकाम करून कमी केलेली आहे. रणजित हा पोहण्याच्या नादात या दगडी बांधकामाजवळ आल्याने कालव्यात वाहून जाऊ लागला. त्याला वाचविण्यासाठी सोनी यांनी पाण्यात उडी मारली, ते पाहून अशोक यांनीही पाण्यात उडी मारली. मात्र, तिघेही दगडी भिंतीतून सोरतापवाडी बाजूकडे गेले आणि दगडी भिंतींच्या प्रवाहामुळे निर्माण झालेल्या पाण्याच्या भोवऱ्यात अडकले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अशोक, सोनी व रणजित हे कालव्याच्या पाण्यात बुडत असल्याचे पाहून कालव्यावर खेळत असलेल्या तीनही मुलांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तो ऐकून सुनील चौधरी, चुनका वर्मा व दादा निळकंठ कुंजीर या तिघांनी कालव्याच्या भरावाकडे धाव घेतली. यात रणजित हा कालव्याच्या एका बाजूला आल्याने तत्काळ हाती लागला, तर सोनी यांना दहा मिनिटाच्या प्रयत्नानंतर पाण्याच्या भोवऱ्यातून बाहेर काढले. मात्र. त्यांचा मृत्यू झाला होता. अशोक यांनाही घटनास्थळी आलेल्या नागरिक व पोलिस कर्मचाऱ्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सापडले नाहीत, लोणी काळभोर पोलिस, स्थानिक नागरिक व अग्निशामक दलाचे जवान अशोक यांचा शोध घेत आहेत. 

अशोक व सोनी या दांपत्याला राज (वय 11), रजनी (वय 9), रणजित (वय 7) व निसू (वय 6) अशी चार मुले आहेत. आपल्या आईवडिलांना बुडताना पाहून ते मोठ्या प्रमाणात घाबरले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com