पुणे : मिळकतकराच्या निर्णयावर अजित पवारांच्या भूमिकेची उत्सुकता!

टीम ई-सकाळ
Friday, 15 May 2020

अभय योजनेचा दाखला देत मिळकतधारकांच्या करात सूट देण्याचा आग्रह धरला आहे. 

पुणे Coronavirus  : कोरोनाच्या हल्ल्याने महापालिकेच्या तिजोरित खडखडा असतानाच पुण्यातील व्यावसायिक मिळकतींच्या मिळकतकरात 25 ते 30 टक्के सवलतीचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांनी महापालिकेला दिला. व्यावसायिकांना घसघशीत सवलतीचा हा सल्ला महापालिकेपुरताच मर्यादित न ठेवता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंतही पोचविला आहे. परिणामी, महापालिकेला हमखास उत्पन्न देणाऱ्या मिळकतकरातील सवलतीबाबत अजित पवार काय भूमिका घेणार? याची उत्सुकता आहे. दरम्यान, पुणे महापालिकेच्या कामकाजाबाबत पुढच्या चार दिवसांत उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

आणखी वाचा - जिसका कोई नही उसका खुदा है यारों

कोरोना आणि त्यानंतर लॉकडाउनमुळे पुणे महापालिकेच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. विशेषत: उत्पन्नाचा आलेख झपाट्याने कमी झाला आहे. त्यात थोडीफार आशा उरली आहे; ती मिळकतकराच्या उत्पन्नाची. या स्थिती कितपत कर जमा होईल, याची साशंकता असताना पुणेकरांनी गेल्या सव्वामहिन्यांत सव्वाशे कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. मिळकतकर जमा होत असतानाच नगरसेवक मानकर यांनी मात्र, अभय योजनेचा दाखला देत व्यावसायिक मिळकतधारकांच्या करात सूट देण्याचा आग्रह धरला आहे. आपली मागणी कशी योग्य आणि त्यामुळे किती लोकांना दिलासा मिळणार आहे, हेही पटवून देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना पत्र धाडले आहे.

पुण्याच्या बातम्यासाठी येथे क्लिक करा

""पुणे शहरात लॉकडाउनमुळे दोन-पावणेदोन महिने छोटे-मोठे सर्वच उद्योग-व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांसह तेथील कामगारांच्या रोजच्या जगण्याचा प्रश्‍न उभा ठाकला आहे. लॉकडाउनचे परिणाम अनेक महिने सोसावे लागतील. तेव्हा, व्यापाऱ्यांनी करही भरायला हवा. तो आतापर्यंत भरत आला नाही. परंतु, सध्याची आर्थिक स्थिती लक्षा घेऊन या घटकांना मिळकतकरात सवलत दिल्यास उद्योग-धंदे उभारणीला थोडाफार हातभार लागणार आहे,' अशी भूमिका मानकार यांनी मांडली. दरम्यान, थकबाकींवर महिन्याला 24 टक्के शास्ती म्हणजे दंड आकारला जातो, त्यातील तीन महिन्यांचा दंडही माफ करण्याची कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षाही मानकरांची आहे.

आणखी वाचा - वेल्हे तालुक्यातल्या संशयितांच्या अहवालाचं काय झालं?

सव्वामहिन्यांत महापालिकेला सव्वाशे कोटींचा महसूल कोरोनाच्या दहशतीने महापालिकेला यंदा कितपत उत्पन्न मिळेल, याची धास्ती असतानाच जेमतेम सव्वा महिन्यात तब्बल 127 कोटी रुपयांचा मिळकतकर जमा झाला आहे. विशेश बाब म्हणजे, गेल्या दोन दिवसांत पावणेसात कोटी रुपये गोळा झाले असून, पुढच्या चार दिवसांत एकूण दीडशे कोटी रुपयांचा महसूल जमा होण्याची आशा महापालिकेला आहे. पुणेकरांचे कर भरण्याला प्राधान्य असून, सर्वाधिक कर हा ऑनलाइन जमा झाल्याचे महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्यासाठी येथे क्लिक करा

सुमारे 1 लाख 33 लाख 783 निवासी आणि व्यावसायिक मिळकतधारकांनी कर भरला आहे. तर 11 आणि 12 मे या दोन दिवसांतच 5 हजार 350 मिळकतधारकांनी 6 कोटी 64 लाख 99 हजार रुपये जमा केले आहेत. पुढच्या चार दिवसांत आणखी 15 ते 18 कोटी रुपया जमा होण्याचा अंदाज आहे. कानडे म्हणाले,  ‘नव्या आर्थिक वर्षात सुरवतीापासून कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. विशेषत: ऑनलाइन प्रक्रियेत कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली आहे. त्याशिवाय विविध भागांत 27 नागरी सुविधा केंद्र सुरू केले आहेत.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid lockdown municipal corporation professional tax exemption demand