उजनीत वाळू उपसा करणाऱ्या दहा बोटी उद्ध्वस्त

उजनीत वाळू उपसा करणाऱ्या दहा बोटी उद्ध्वस्त

इंदापूर : तहसीलदार अनिल ठोंबरे व इंदापूर पोलीस (indapur police) ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी उजनी जलाशयामध्ये (ujani dam) माळवाडी ते शिरसोडी परिसरात अवैध वाळू उपसाकरणाऱ्या एकूण ७ फायबर बोटी व ३ सक्शन बोटी जिलेटिनच्या साह्याने उद्ध्वस्त केल्या. या धडक कारवाईमध्ये एकूण १ कोटी २०लाख रुपये किमतीच्या वाळू उपसाकरणाऱ्यायांत्रिकी बोटी उद्ध्वस्त करण्यातआल्या.आठवडाभरात महसूल व पोलीस प्रशासनाने दुसऱ्यांदा थेट कारवाई केल्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. (Crackdown against illegal sand mining ujani dam)

या कारवाईत तहसीलदार ठोंबरे, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोडसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेशमाने,पोलीस शिपाई अर्जुन नरळे, अमोलगारुडी,समाधान केसकर, सुहास आरणे, अर्जुन भालसिंग, पोलीस पाटील राजेंद्र शिंदे, अरुण कांबळे ,सुनील राऊत, महसूल विभागाचे तलाठी यांनी भाग घेतला. या कारवाईत वाळू माफियांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीसांनी वाळू माफियांची नावे उघड करावीत, त्यांच्यावर निश्चित काय कारवाई झाली याची माहिती द्यावी तसेच अवैध वाळू व्यवसाय संपूर्णपणे बंद करावा अशी मागणी उजनी पाणलोट मधील नागरिकांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com