पिरंगुट घाटात दरड कोसळल्याने अपघाताचा धोका

धोंडिबा कुंभार
सोमवार, 23 जुलै 2018

पुणे कोलाड रस्त्यावर पिरंगुट (ता. मुळशी) येथील घाटात दरड कोसळल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य रस्ता महामंडळाच्या टोलवाटोलवीमुळे गेली वीस ते बावीस तास दरडीचे मोठमोठे दगडाचे ढीग भर रस्त्यात पडून होते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
 

पिरंगुट - पुणे कोलाड रस्त्यावर पिरंगुट (ता. मुळशी) येथील घाटात दरड कोसळल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य रस्ता महामंडळाच्या टोलवाटोलवीमुळे गेली वीस ते बावीस तास दरडीचे मोठमोठे दगडाचे ढीग भर रस्त्यात पडून होते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

काल रविवार (ता.22) रोजी रात्रीच्या सुमारास येथील थोरल्या मोरीजवळ दरड कोसळली आहे. मोठे दगड भर रस्त्यात पडले आहेत. या ठिकाणी तीव्र उतार व तीव्र वळण आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांशी सकाळने दिवसभरात दोनदा संपर्क साधूनही त्यावर कार्यवाही झाली नाही.

तांत्रिक अडचणीच्या सबबी सांगून दोन्हीही अधिकाऱ्यांनी दरड दूर करण्यास नकार दिला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुळशीचे उपअभियंता अनिल शिंदे म्हणाले, या रस्त्याच्या दुरुस्तीचे सर्व अधिकार एमएसआरडीसीला दिलेले असून वर्क ऑर्डरही निघाली आहे. त्यामुळे, आम्ही त्यासाठी काहीच करु शकत नाही. एमएसआरडीसीचे अधिकारी पाटील म्हणाले की, या  रस्त्याचे आमच्याकडे अद्याप हस्तांतरण झालेले नाही त्यामुळे ही दरड आम्ही दूर करु शकत नाही.

Web Title: Crashing of rift in Pirangut Ghat causes risk of accident