अण्णाभाऊ साठेंच्या कुटुंबियांना दिला व्यवसाय थाटून

श्रीकृष्ण नेवसे
शुक्रवार, 4 मे 2018

सासवड (पुणे) : येथील सार्वजनिक व सामाजिक उपक्रमात आघाडीवर असलेल्या अजय सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने आणखी एक सामाजिक उपक्रम केला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सूनबाई व नातीसहच्या असलेल्या अडचणीतील कुटुंबास उदरनिर्वाहाकरीता `जनरल स्टोअर्स` वाटेगाव येथे सुरु करुन दिले.   

सासवड (पुणे) : येथील सार्वजनिक व सामाजिक उपक्रमात आघाडीवर असलेल्या अजय सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने आणखी एक सामाजिक उपक्रम केला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सूनबाई व नातीसहच्या असलेल्या अडचणीतील कुटुंबास उदरनिर्वाहाकरीता `जनरल स्टोअर्स` वाटेगाव येथे सुरु करुन दिले.   

वाटेगाव (ता. वाळवा, जि. सांगली) येथे अण्णाभाऊंच्या कुटुंबियांना मायावतींनी 15 वर्षांपूर्वी घर बांधून दिले होते. मात्र सासवडच्या या अजय मंडळाच्या लक्षात अण्णाभाऊंच्या सूनबाई सावित्राबाई साठे, एक नात असलेल्या कुटुंबाची परिस्थिती हालाखीची असल्याचे लक्षात आले. मग मंडळाने प्रथम त्यांना धान्य दिले व पुढेही वर्षभर ते देण्याचे जाहीर केले. त्यानंतर त्या जुन्या झालेल्या घराला रंगरंगोटी केली. तर दिवाळीला संपूर्ण फराळ, कपडे दिले. तर आता अण्णाभाऊंच्या या अडचणीतील कुटुंबास उदरनिर्वाहाकरीता `जनरल स्टोअर्स` वाटेगाव येथे सुरु करुन दिले. त्याचा शुभारंभ अंध संगीत शिक्षक बालाजी सुर्यवंशी व विशेष मुलांच्या प्रेरणा शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते केला.

त्यास मंडळाचे अध्यक्ष प्रविण पवार, प्रविण महामुनी, संदिप काळे, संजय काटकर, विशाल जंगम व कार्यकर्ते उपस्थित होते. तर वाटेगावचे रविंद्र बिर्डे, डाॅ. भाऊ बने, बाळासाहेब पाटील, प्रकाश पाटील, राहुल वेदपाठक आदीही उपस्थित होते. जनरल स्टोअर्स उभे करुन त्यातील रंगरंगोटी, फर्निचर, विक्रीसाठीचा संपूर्ण माल मंडळाने भरुन दिला. यानिमित्ताने अण्णाभाऊंच्या स्मारकात जाऊन त्यांच्या पुतळ्याचे पुजनही कार्यकर्त्यांनी केले. यानिमित्ताने प्रविण पवार यांनी आवाहन केले की, अण्णाभाऊंच्या कुटुंबियास या पध्दतीने मदतीसाठी इतर लोकांनी पुढे आल्यास अण्णाभाऊंच्या स्मृतिला खऱया अर्थाने वंदन केल्यासारखे होईल. प्रविण पवार यांच्या संपर्कासाठी क्रमांक 9850777709 यावर कुटुंबियांची माहिती मिळेल.   

अजय मंडळाने सासवडच्या कस्तुरबा आश्रमास गोदान करुन शंभर विद्यार्थीनींना वेळोवेळी मदत केली, सासवडच्या विशेष मुलांना अष्टविनायक सहल घडविली, सरकारी रुग्णालयातील गरीब रुग्णांना नाष्टा उपक्रम आजही सुरु, गरीब घरच्या 35 गृहीनींना संसाराला हातभार लावण्यासाठी शिलाई मशिन व व्यवसायासाठी हातगाड्या मंडळाच्या खर्चातून दिल्या, स्थानिक बेवारस मृतांचा अंत्यविधी खर्च मंडळ 14 वर्षे करते आहे, निराधार महिलांना धान्य, गरीब मुलींच्या लग्नात संसारोपयोगी भांडी, 15 वर्षे सामुदायिक विवाह अशीही सामाजिक कामे आहेत.

Web Title: create business for anna bhau sathe family