डॉक्‍टरांमध्ये विश्‍वास निर्माण करण्यासाठी "फोरम' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

पुणे - ""धोरणात्मक बदल आणि स्थानिक पातळीवर डॉक्‍टरांमध्ये विश्‍वास निर्माण करणे, हा "पुणे सिटीझन डॉक्‍टर फोरम'चा उद्देश आहे,'' असे फोरमचे डॉ. अरुण गद्रे यांनी शुक्रवारी येथे सांगितले. 

डॉक्‍टर आणि नागरिकांमध्ये संवाद वाढवणे, वैद्यकीय क्षेत्रातील ज्वलंत प्रश्‍नांवर चर्चा करणे यासाठी तयार केलेल्या "पुणे सिटीझन डॉक्‍टर फोरम'चे उद्‌घाटन शुक्रवारी करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या निमित्ताने medimitra.org हे संकेतस्थळही लोकांसाठी खुले करण्यात आले. डॉ. अनंत फडके, ऍड. असिम सरोदे, डॉ. श्रीराम गीत आणि ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे व्यासपीठावर उपस्थित होते. 

डॉ. गर्दे म्हणाले, ""पूर्वी डॉक्‍टरांवर असणारा रुग्णांचा विश्‍वास कापरासारखा उडून गेला आहे. डॉक्‍टरांना झालेली मारहाण दिसते. रुग्णांच्या नातेवाइकांचा राग दिसतो; पण त्यापूर्वी अनेक गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे डॉक्‍टर आणि रुग्ण आक्रंदित आहेत. समाजासाठी ही धोक्‍याची घंटा आहे. चांगले डॉक्‍टर हवे आहेत. नजीकच्या भविष्यात ही पिढी अस्तंगत होऊ नये, यासाठी हा फोरम आहे. या फोरमची प्रेरणा नागरिक आहेत. या फोरमच्या माध्यमातून चांगले डॉक्‍टर शोधणे ही नागरिकांची जबाबदारी आहे.'' 

मध्यम वर्ग आता जागा होत आहे. समाजाने दिलेला हा सक्रिय प्रतिसाद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

सरोदे म्हणाले, ""मोकळ्या आणि निर्भय वातावरणात उपचार झाले पाहिजेत. त्याचवेळी रुग्णांच्या हक्कांचे संतुलनही झाले पाहिजे. हे संतुलन होत नसल्याने सध्या डॉक्‍टर-रुग्ण संबंध बिघडल्याने आरोग्य चळवळ हा डॉक्‍टरांनी आपल्या कामाचा भाग करणे आवश्‍यक आहे.'' 

डॉ. गीत म्हणाले, ""तीन मिनिटे रुग्णांचे ऐका, रुग्णांना तीन वेळा विचारा, त्यानंतर रुग्णाला तपासण्यासाठी उठा. हे जगभरातील तज्ज्ञांनी सांगितले आहे; तसेच डॉक्‍टरांची उपलब्धता असणे गरजेचे आहे. त्यांच्याबद्दल समाजात विश्‍वास असला पाहिजे आणि पारदर्शकता आवश्‍यक आहे.'' 

आगाशे म्हणाले, ""या फोरमच्या माध्यमातून चांगल्याचा पुरस्कार होईल आणि वाईटाचा प्रतिकार होईल. या फोरममध्ये नागरिकांचा सहभाग हा सर्वांत महत्त्वाचा आहे.''  प्रीती दामले यांनी सूत्रसंचालन केले. 

Web Title: To create trust in the doctors 'Forum'