Pune : दिवाळी निमित्त विशेष मुलांकडून वस्तूंची निर्मिती

कामायनी संस्थेतील विशेष मुलांचा उपक्रम
pune
punesakal
Summary

कामायनी संस्थेतील विशेष मुलांचा उपक्रम ; मुलांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करण्याची व पाहण्याची संधी पुणेकरांना आहे

शिवाजीनगर : कामायनी प्रशिक्षण व संशोधन सोसायटी गोखलेनगर या संस्थेत शिक्षण घेत असलेले विशेष ( दिव्यांग) विद्यार्थी मागील एक महिन्यापासून दिवाळीच्या निमित्ताने विविध वस्तू बनवण्यात मग्न आहेत.

आपला परिसरात प्रकाशनाने उजळून निघावा यासाठी विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी आकाश कंदील, आकर्षक पणत्या, मेणबत्त्या, भाजणी उठणे, सुपारी तसेच हार , तोरण ,आकर्षक माळा, हातमाग व पॉवरलूम वर विणलेले टॉवेल , बेडशीट, फ्लोअर डस्टर किचन नॅपकिन्स इत्यादी वस्तू या विद्यार्थ्यांनी बनवल्या आहेत.

दिवाळी नुकतीच तोंडावर आली आहे. या निमित्ताने वरिल वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मंगळवार व बुधवार ऑक्टोंबर दोन दिवस कामायनी कार्यालय गोखलेनगर येथे आसणार आहे.

मुलांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करण्याची व पाहण्याची संधी पुणेकरांना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com