esakal | शिधापत्रिकाधारकांना २ महिन्यांचे आगाऊ धान्य मिळणार
sakal

बोलून बातमी शोधा

Ration-Card

शिधापत्रिकाधारकांना येत्या मे आणि जून महिन्यांचे आगाऊ धान्य देण्याचे प्रयत्न शहर अन्न धान्य वितरण कार्यालयाकडून केले जात आहे.

सध्या सर्वत्र कोरोना विषाणू चा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून व्यापक प्रमाणावर नियोजन केले जात आहे. त्याचाच, एक भाग म्हणून वरील निर्णय होण्याची शक्यता आहे.

शिधापत्रिकाधारकांना २ महिन्यांचे आगाऊ धान्य मिळणार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शिधापत्रिकाधारकांना येत्या मे आणि जून महिन्यांचे आगाऊ धान्य देण्याचे प्रयत्न शहर अन्न धान्य वितरण कार्यालयाकडून केले जात आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या सर्वत्र कोरोना विषाणू चा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून व्यापक प्रमाणावर नियोजन केले जात आहे. त्याचाच, एक भाग म्हणून वरील निर्णय होण्याची शक्यता आहे. 

Coronavirus : कोरोना व्हायरसची लक्षणे दिसताहेत? घाबरू नका पण...

शहर अन्न धान्य वितरण कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी,सर्व शिधापत्रिका धारकांना ई-पॉस मशीनवर अंगठ्याच्या ठसा उमटविल्यावर धान्य दिले जात असे. परंतु, त्यातही आता सूट देण्यात आली आहे. रास्त भाव दुकानदाराने आधार कार्डावरून शिधापत्रिका धारकांची पडताळणी करण्याच्या सूचना ही कार्यालयाने दिल्या आहेत. सध्या एप्रिल महिन्याचे धान्य दुकानांपर्यंत पोचविले जात आहे. पुढील १५ दिवसांत मे आणि जून महिन्यांचे ही धान्य आगाऊ देण्याचे प्रयत्न अन्न धान्य वितरण कार्यालयाकडून केले जात आहेत.

शिवभोजन केंद्रे चालू राहणार
पिंपरी चिंचवड शहरात सध्या ४ शिवभोजन थाळी केंद्रे सुरू आहेत. तुर्तास ही केंद्रे बंद करण्याचे कोणतेही आदेश मिळाले नाहीत. त्यामुळे, ही सर्व केंद्रे चालू राहतील, असेही शहर अन्न धान्य वितरण कार्यालयाने म्हटले आहे.

loading image