पिंपरी-चिंचवडमध्ये शवदाहिनी' निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार

PCMC
PCMC

महापालिकेच्या तीन अभियंत्यासह लेखाधिकारी दोषी; आयुक्तांची कारवाई
पिंपरी - महापालिकेतर्फे पाच वर्षांपूर्वी पाच ठिकाणी पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी बसविण्यात आल्या. तसेच, सांगवीतील स्मशानभूमीसाठी शवदाहिनी खरेदी करण्यात आली. या दोन्ही प्रक्रियांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकरणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तीन अभियंते व लेखाधिकारी यांना दोषी ठरवले आहे. वैयक्तीक लाभासाठी निविदा प्रक्रिया राबविल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना २०१६ मध्ये पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी बसविण्याचे नियोजन केले. तर, सांगवीत शवदाहिनी बसविण्यात आली होती. यामध्ये गैरव्यहार झाल्याचा आरोप नगरसेविका सीमा सावळे यांनी केला होता. तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे व तत्कालीन स्थायी समिती सभापती हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांना महापालिका इमारतीतच भाजप कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता. त्यामुळे वाघमारे यांनी निविदा प्रक्रियेला स्थगिती दिली होती. महापालिका निवडणूक तोंडावर असतानाच हे प्रकरण गाजले होते. चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली होती. 

असे आहेत आक्षेप
निविदा प्रक्रिया राबविताना पुर्वगनपत्रकासाठी बाजार भावाचा अंदाज न घेता अंदाजपत्रक तयार करणे, स्पेसिफिकेशन सादर न करणे,  अपात्र निविदाधारकांना पात्र करणे, महत्वाचे दस्तावेज फाईलमध्ये समाविष्ट न करणे, प्राप्त दरांची बाजारभावानुसार शहानिशा न करणे, दराचे पृथ:करन न करता निविदा कामकाज करणे, वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे पालन न करणे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यायाचा (सीओईपी) थर्ड पार्टी टेक्निकल अहवाल देखील मागविण्यात आला होता.

वेतनवाढ रोखली
पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांच्या दोन वेतनवाढी कायमस्वरुपी स्थगित केल्या. तर, उपअभियंता मनोहर जावरानी, कनिष्ठ अभियंता विकास घारे यांची कायमस्वरुपी एक आणि लेखाधिकारी किशोर शिंगे यांची तात्पुरत्या स्वरुपात एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. उपलेखापाल उषा थोरात यांना दोषारोप मुक्त करत सक्त ताकीद दिली आहे. यापुढे गैरवर्तन केल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे. या आदेशाची त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com