
क्रिकेटचे क्रीडा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील शासन क्रीडा संकुलामध्ये प्रथम क्रिकेटचे टर्फ मैदान बनवण्याचे काम इंदापूर तालुका क्रीडा संकुलमध्ये सुरू करण्यात आले.
इंदापूर : क्रिकेटचे क्रीडा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील शासन क्रीडा संकुलामध्ये प्रथम क्रिकेटचे टर्फ मैदान बनवण्याचे काम इंदापूर तालुका क्रीडा संकुलमध्ये सुरू करण्यात आले.
PSI महिला अधिकाऱ्याशी लव्ह मॅटर; पोलिस शिपायाने ठाण्याच्या टेरेसवरुनच मारली उडी
सामान्य प्रशासन राज्य मंत्री तथा तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम होत असून मैदान तालुक्यातील खेळाडूंना वरदान ठरणार असल्याची विशेष माहिती तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांनी दिली.
इंदापूर तालुका क्रीडा संकुलात क्रिकेटचे टर्फ मैदान बनवण्याच्या कामाचे भूमिपूजन गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागातील उदयन्मुख खेळाडूंना प्रशिक्षणाचा लाभ घेता यावा म्हणून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान बनवण्यात येत आहे.
प्रेयसीच्या पतीवर प्रियकरानेच केला प्राणघातक हल्ला
चावले पुढे म्हणाले, ''अनेक दिवसांपासून तालुक्यामध्ये क्रिकेटचे टर्फ मैदान व्हावे अशी क्रिकेटप्रेमींची इच्छा होती. त्यांनी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे मैदानाची मागणी केल्यानंतर त्यांनी तात्काळ तालुका क्रीडा संकुलामध्ये टर्फ मैदान बनविण्यात यावे अशा सूचना संबंधितांना दिली. त्यानंतर तात्काळ कामाचे नियोजन करून या संकुलामध्ये हे काम हाती घेण्यात आले.''
(संपादन : सागर डी. शेलार)