गुन्हेगारी घटनांनी शहर हादरले

crime
crime

पुणे - कर्वेनगर व कात्रज येथे गाड्यांची तोडफोड व जाळपोळ, रहदारीच्या ठिकाणी महिलेचा विनयभंग करण्याचा प्रकार, राजकीय पदाधिकाऱ्यासह एका वकिलावर झालेला गोळीबार यांसारख्या गंभीर घटनांनी सोमवारी शहर हादरले. या घटनांमुळे गुन्हेगारांकडून वारंवार होणाऱ्या त्रासामुळे पुणेकर त्रस्त झाला असून, शहरात गुन्हेगारांवर पोलिसांचा खरोखरच वचक राहिला आहे काय, असा प्रश्‍न नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे.

शहर व उपनगरामध्ये सोनसाखळी चोरी, घरफोडीच्या घटना नित्याच्याच झाल्या असताना संघटित गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. सोमवारी पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत शहरात समाजकंटकांनी विविध भागात उच्छाद मांडला. पहाटे अडीचच्या सुमारास एका टोळीने दहशत निर्माण करण्यासाठी कर्वेनगरमधील हिंगणे होम कॉलनीतील १६ गाड्या फोडल्या. त्यावर पोलिस कारवाई करत नाहीत, तोच सकाळी अकराच्या सुमारास कात्रजमधील एका सोसायटीतील गाड्या पेटवून दिल्या. त्यानंतर भरदुपारी बारा वाजता गजबजलेल्या मंडईच्या परिसरात खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या विनयभंगाचा प्रकार घडला, तर सायंकाळी संगमवाडी येथे एका वकिलावर दुचाकीवरून आलेल्यांनी गोळीबार केला. त्याअाधी रविवारी कात्रजमधीलच सोसायटीतील गाड्या पेटविल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com