Baramati Crime : 53 लाखांच्या दरोड्याचा तालुका पोलिसांकडून छडा; सहा अटकेत

सहा दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या
Baramati Crime
Baramati Crimesakal

बारामती : मालासह निघालेल्या ट्रक चालकाचे जबरदस्तीने अपहरण करून वाहनातून 35 लाखांचे लोखंडी राॅड दरोडा टाकून लुटणाऱया टोळीला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली. बारामती न्यायालयाने या प्रकरणातील सहा आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

दिग्विजय श्रीकांत जाधव (वय 21), लक्ष्मण भीमराव कुचेकर (वय 30), सुहास रावसाहेब थोरात (वय 28, तिघे रा. उदमाईवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे), प्रथमेश मनोज शेलार (वय 23, रा. घोलपवाडी, ता. इंदापूर), मयुर प्रकाश शिंदे (वय 28, रा. तावशी, ता. इंदापूर) व स्वप्निल दत्तात्रय निंबाळकर (वय 28, रा. 39 फाटा, सणसर, ता. इंदापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी मारुती मोतीलाल करांडे (रा. आसंगी, ता. जत, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली होती. मंगळवारी (ता.9) ही घटना घडली. करांडे त्यांच्या ट्रक (एनएल-01, एबी-3577) मधून बारामती एमआयडीसीतील माऊली कृपा ट्रान्सपोर्टमार्फत कर्नाटक येथून लोखंडी राॅड भरून पुण्यात मुंढवा येथील भारत फोर्जमध्ये घेवून जाण्यासाठी निघाले होते.

भिगवणजवळ ते गाडीतच झोपले असताना तिघांनी त्यांच्याकडून चार हजार रुपये व मोबाईल चोरला. ट्रेलर चालू करून तो बारामतीच्या दिशेने आणला. भिगवणमध्ये त्यांना आणखी तीन साथीदार मिळाले. त्यांनी या ट्रकमधून 35 लाखांचे लोखंडी राॅड चोरले. तसेच 19 लाख रुपये किंमत असलेले वाहनही त्यांनी नेले. करांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञाताविरोधात दरोड्याचा व जबरी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

बारामती नजिक कन्हेरीच्या हद्दीत पालखी महामार्गालगत त्यांनी हे वाहन आणले. तेथून दुसऱया वाहनात हे राॅड टाकून ते दुसरीकडे नेत विकण्याचा त्यांचा हेतू होता. करांडे यांनी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत बारामती तालुका पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेत तात्काळ पथके रवाना केली.

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याचे काम सुरु असतानाच ट्रेलरसह दोन दरोडेखोरांना जागीच पकडण्यात आले. त्यांच्याकडून इतर साथीदारांची माहिती घेत आजूबाजूच्या झाडाझुडपात लपून बसलेल्या अन्य चार जणांना पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com