Pune Crime : राष्ट्रवादीचे दयानंद इरकल यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

बेकायदेशीर आंदोलन करून प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
crime news
crime news esakal
Summary

बेकायदेशीर आंदोलन करून प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुणे - बेकायदेशीर आंदोलन करून प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलिस हवालदार नवनाथ नामदेव डांगे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून दयानंद इरकल (रा. गोखले नगर), पंकज पवार, शंकर डोंगरे, सुनील मुंढे, गोट्या बदामी यांच्यासह ६० ते ७० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील महिन्यात एका वकील तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी इरकल आणि त्यांच्या पत्नीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याच्या निषेधार्थ इरकल यांनी २८ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीमुळे शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. परंतु इरकल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर आंदोलन करुन घोषणाबाजी केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com