पिंपरी: पाण्यासाठी रास्ता रोको करणाऱ्या नगरसेवकांवर गुन्हा 

संदीप घिसे 
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

पिंपरी (पुणे) - पाण्यासाठी रास्ता रोको करणाऱ्या नगरसेवक रोहित काटे यांच्यासह इतरांवर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. ५) दापोडी येथे घडली.

पिंपरी (पुणे) - पाण्यासाठी रास्ता रोको करणाऱ्या नगरसेवक रोहित काटे यांच्यासह इतरांवर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. ५) दापोडी येथे घडली.

गेल्या काही दिवसांपासून दापोडी परिसरामध्ये पाण्याचा प्रचंड तुटवडा आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. तरीदेखील पाणी पुरवठय़ामध्ये सुधारणा झाली नाही. यामुळे दापोडी येथील नागरिकांनी नगरसेवक रोहित आप्पा काटे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पुणे मुंबई महामार्गावर दापोडी येथे रस्तारोको आंदोलन केले. बेकायदा जमाव जमवून रस्तारोको केल्याप्रकरणी नगरसेवक रोहित आप्पा काटे यांच्यासह इतरांवर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Crime against corporators in pimpri