ग्रामपंचायतीतील बर्थडे सेलिब्रेशन उपसरपंचांना पडले महागात  

grampanchayat
grampanchayat
Updated on

राजगुरुनगर (पुणे) : खेड तालुक्यातील शिरोली या गावच्या महिला उपसरपंचांनी सोशल डिस्टन्सिंगचा नियम न पाळता ग्रामपंचायत कार्यालयामध्येच स्वतःचा वाढदिवस साजरा केला. त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरोलीच्या उपसरपंच जया दसगुडे यांनी २३ जुलै रोजी आपला वाढदिवस ग्रामपंचायत कार्यालयामध्ये केक कापून व सोशल डिस्टंसिंग न पाळता साजरा केला होता. या वेळी या ठिकाणी ग्रामसेवकही उपस्थित होते. या समारंभाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांच्या या कृत्याबद्दल सहा ग्रामपंचायत सदस्यांनी खेडचे गटविकास अधिकारी अजय जोशी यांच्याकडे तक्रार केली होती. तसेच, त्यांनी खेड पोसिस ठाण्यातही तक्रार अर्ज दिला होता. त्यावरून त्यांच्यावर सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याबद्दल भा. द. वि. कलम १८८ अन्वये ३१ जुलै रोजी गुन्हा दाखल केला. 

शिरोली गावामध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत असतानाही उपसरपंचांनी बेजबाबदारपणे हा समारंभ केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी, अशी सहा ग्रामपंचायत सदस्यांनी मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com