बलात्कारप्रकरणी चार जवानांवर गुन्हा

बलात्कारप्रकरणी चार जवानांवर गुन्हा

पुणे - लष्करी रुग्णालयात परिचारक सहायक म्हणून काम करणाऱ्या विकलांग महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून चार जवानांविरुद्ध खडकी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. 

याबाबत संबंधित पीडित विकलांग महिलेने इंदूर येथील एका सामाजिक संस्थेच्या मदतीने तक्रार दिली आहे. त्यानंतर खडकी पोलिसांनी हरून रशीद, मोहंमद मुथाझिम, रवींद्र सिंह आणि अहिरवाल या जवानांवर गुन्हा दाखल केला आहे. लष्करी रुग्णालयात काम करणाऱ्या एका जवानाने २०१४ मध्ये रात्रपाळीच्या वेळी पीडित महिलेच्या विकलांगतेचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची माहिती तिने तिच्या वरिष्ठांना मेसेज करून दिली. मात्र, वरिष्ठाने संबंधित जवानावर कारवाई करण्याऐवजी मेसेजवरून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरवात केली. त्यानंतर या दोघांनीही तिच्यावर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com