अजित पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी महिलेवर सहा ठिकाणी गुन्हा...

भरत पचंगे
Monday, 20 July 2020

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पण्णी केल्याप्रकरणी खेड तालुक्यातील चाकण येथील संगीता वाणखेडे या महिलेवर बुलढाणा जिल्ह्यातील पाच पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.

शिक्रापूर (पुणे) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पण्णी केल्याप्रकरणी खेड तालुक्यातील चाकण येथील संगीता वाणखेडे या महिलेवर बुलढाणा जिल्ह्यातील पाच पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस तरी त्यांची चौकशी सुरू राहिल आणि त्यानंतर पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिसांच्या ताब्यात त्यांना दिले जाईल, अशी माहिती चिलखी (जि. बुलढाणा) पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांनी दिली. 

 इंधन दरवाढीचा वेग सुसाट, डिझेलची दरवाढ सुरूच
     
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पण्णी केल्याप्रकरणी संगीता वाणखेडे (रा. चाकण, ता. खेड) यांच्यावर  बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा शहर, ग्रामिण, चिखली, तांबडापूर व साखरखर्डा आदी पाच पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी आहेत. तसेच, शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्येही स्वप्नील गायकवाड यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांच्या वतीने तपास अधिकारी फौजदार राजेश माळी व त्यांचे पथक वाणखेडे यांना ताब्यात घेण्यासाठी बुलढाण्यात गेले आहे. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तक्रारीची स्वतंत्र चौकशी प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये स्वतंत्र चौकशी अधिकारी करीत आहे. सर्व तक्रारींची आवश्यक ती चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल. त्यासाठी आणखी दोन दिवस लागतील, अशी माहिती चिखली पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांनी दिली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आम्ही गेल्या दोन दिवसांपासून बुलढाणा पोलिसांच्या संपर्कात असून, बुलढाण्यातच आहोत. शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये स्वप्निल गायकवाड यांच्या तक्रारीनुसार दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने संगीता वाणखेडे यांना ताब्यात घेऊनच आम्ही शिक्रापूर पोलिस स्टेशनला हजर होणार असल्याचे तपास अधिकारी फौजदार राजेश माळी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime against woman in six places for defaming Ajit Pawar