अतुल बेनकेंसह ६० जणांवर ‘रास्ता रोको’प्रकरणी गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

नारायणगाव - येथील वारूळवाडी-गुंजाळवाडी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करून वाहतुकीस अडथळा आणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्या प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, तालुका युवक अध्यक्ष सूरज वाजगे, वारुळवाडीचे उपसरपंच, सदस्य यांच्यासह पन्नास ते साठ अज्ञात व्यक्तींवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे-पाटील यांनी ही माहिती दिली.

या प्रकरणी बेनके, वाजगे, उपसरपंच सचिन वारुळे, श्रीकांत वायकर, राहुल गावडे, ग्रामपंचायत सदस्य परशुराम वारुळे, विपुल फुलसुंदर, वरुण भुजबळ, पप्पू नायकोडी, ग्रामोन्नती मंडळाचे संचालक तानाजी वारुळे (सर्व रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यांच्यासह पन्नास ते साठ अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत घोडे-पाटील म्हणाले, ‘‘वारूळवाडी-गुंजाळवाडी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दुरुस्तीच्या मागणीसाठी रविवारी दुपारी बारा ते एक यादरम्यान बेनके यांच्यासह पन्नास ते साठ जणांनी रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. महाराष्ट्र पोलिस अधिनियम ३७ (१) (३) नुसार पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यास बंदी घातली आहे. या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी बेनके यांच्यासह पन्नास ते साठ अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचारी रमेश इचके यांनी फिर्याद दिली आहे.’

Web Title: Crime on Atul Benake with 60 People