भोसरीतील नगरसेवकासह पंधरा जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

भावकीच्या शेतजमिनीत अनाधिकाराने प्रवेश करून जमिनीचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या भोसरीतील नगरसेवक रवी लक्ष्मण लांडगे (धावडे वस्ती, भोसरी) यांच्यासह मरकळ येथील लोखंडे परिवारासह १५ तृतीयपंथीयांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ही घटना मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये घडली होती आणि शनिवारी रात्री आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक नसून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

आळंदी - भावकीच्या शेतजमिनीत अनाधिकाराने प्रवेश करून जमिनीचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या भोसरीतील नगरसेवक रवी लक्ष्मण लांडगे (धावडे वस्ती, भोसरी) यांच्यासह मरकळ येथील लोखंडे परिवारासह १५ तृतीयपंथीयांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ही घटना मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये घडली होती आणि शनिवारी रात्री आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक नसून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

संतोष काळूराम लोखंडे (वय ३९, मरकळ, ता. खेड) यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी लांडगे, आनंद बारकू लोखंडे, शुभेस मुकेश लोखंडे, अविनाश मुकेश लोखंडे, लता मुकेश लोखंडे, आळंदीतील नियती शिंदे यांच्यासह पंधरा तृतीयपंथीयांवर आळंदी पोलिस ठाण्यात रात्री सव्वा दहाच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे. 

फिर्यादी संतोष लोखंडे यांच्या मालकीच्या मरकळ येथील जमिनीत मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या भावकीतील लोकांची भांडणे होती. या वेळी रवी लांडगे आणि नियती शिंदे यांच्यासह पंधरा तृतीयपंथी, आरोपी लोखंडे सर्व जणांनी मिळून जेसीबीच्या साहाय्याने फिर्यादी संतोष लोखंडे यांच्या जमिनीत प्रवेश केला. सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांच्या पीकांचे नुकसान करण्यात आले. त्या वेळी फिर्यादी लोखंडे यांची आई मालन लोखंडे, ज्योत्स्ना लोखंडे, सुनील लोखंडे, शोभा लोखंडे, निखिल लोखंडे यांनी आमच्या जमिनीत अनाधिकाराने कुंपन घालू नका, असे आरोपींना सांगत होते. आरोपींनी फिर्यादी लोखंडे कुटुंबीयांना दमदाटी करून मारहाण केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime on Bhosari Corporator with 15 people