Mahadev App: महादेव बेटिंग अ‍ॅपचे पुणे कनेक्शन, व्यापाऱ्यासह 70 जणांना अटक

Mahadev App Pune Connection: महादेव बेटिंग प्रकरण समोर आले तेव्हा देशातील विविध राज्यांसह परदेशातही कारवाई करण्यात आली होती.
Mahadev Book Pune Police Action
Mahadev Book Pune Police ActionESakal

देशभर गाजत असलेल्या महादेव बेटिंग ॲप प्रकरणी नारायणगाव येथे पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पाेलिसांनी नारायणगाव येथील एका मोठ्या व्यापाऱ्यासह त्याच्या कुटुंबातील दोन व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान या प्रकरणाशी संबंध असणाऱ्या सुमारे 70 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

महादेव बेटिंग प्रकरण समोर आले तेव्हा देशातील विविध राज्यांसह परदेशातही कारवाई करण्यात आली होती. आता याच प्रकरणी नारायणगावात पोलिसांनी कारवाई करत याचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आणले आहे.

Mahadev Book Pune Police Action
Astrologer: घरगुती समस्या सोडवण्यासाठी ज्योतिषाकडे गेली अन् भलत्याच संकटात अडकली, पुण्यात तरुणीसोबत धक्कादायक प्रकार

दरम्यान पोलिसांनी केलेल्या छापेमारीनंतर समोर आले की, या महादेव बेटिंगचे काम नारायणगावातील एका इमारतीमध्ये सुरु हाेते. पोलिसांनी छापा टाकलेली संपूर्ण संपुर्ण इमारत महादेव अँपसाठी वापरत असल्याची माहिती समाेर आली आहे.

यावेळी पोलिसांनी या इमारतीत काम करणारे 70-80 जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com