Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेता अडकला, साहिल खानला छत्तीसगडमधून अटक

Sahil Khan: ॲपच्या प्रचारासाठी साहिलने आपला प्रभाव वापरला. तो सेलिब्रिटींना आमंत्रित करायचा आणि भव्य पार्ट्यांचे आयोजन करायचा.
Sahil Khan
Sahil KhanEsakal

ऑनलाइन महादेव बुक बेटिंग प्रकरणातील आरोपी अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, अभिनेता साहिल खानचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने काल फेटाळला होता. या प्रकरणावर न्यायालयाने म्हटले होते की, संपूर्ण गुन्ह्याचे व्यापक स्वरूप पाहता या प्रकरणाचा सखोल तपास करणे आवश्यक आहे. सध्याच्या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण कारवाई बेकायदेशीर असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात मोठी रक्कम गुंतलेली आहे.

न्यायालयाने पुढे म्हटले की, या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट सिमकार्ड आणि बँक खाती वापरली गेली आहेत, त्यामुळे साहिल खानविरुद्ध उपलब्ध पुरावे पाहता त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे त्याला अटकेतून दिलासा देता येणार नाही. ( Sahil Khan's Arrest In Mahadev Betting App)

महादेव बुक बेटिंग प्रकरणात अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत. आता या यादीत साहिल खानच्या नावाचाही समावेश झाला आहे. साहिल खानला मुंबई पोलिसांनी छत्तीसगडमध्ये ताब्यात घेण्यात आले असून तेथून त्याला मुंबईत आणले जात आहे.

साहिल खान Lotus Book 24/7 नावाच्या बेटिंग ॲप वेबसाइटचा भागीदार आहे, जो महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा भाग आहे.

या अभिनेत्यावर लायन बुक ॲपचा प्रचार आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा आरोप आहे. लायन बुकची जाहिरात केल्यानंतर त्यांनी भागीदार म्हणून Lotus Book 24/7 ॲप लाँच केले.

ॲपच्या प्रचारासाठी साहिलने आपला प्रभाव वापरला. तो सेलिब्रिटींना आमंत्रित करायचा आणि भव्य पार्ट्यांचे आयोजन करायचा. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. लवकरच पोलीस प्रकरणातून आणखी अनेक मोठे पैलू समोर येऊ शकतात.

Sahil Khan
Hassan Sex Scandal: माजी पंतप्रधानांच्या नातवाच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

अभिनेता साहिल खान त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. एक्सक्यूज मी आणि स्टाईल सारख्या चित्रपटात त्याने काम केले आहे. मात्र, साहिलला चित्रपटांमध्ये काही अप्रतिम करता आले नाही. यानंतर त्याने इंडस्ट्री सोडली. यानंतर त्याचा फिटनेस प्रवास सुरू झाला आणि तो फिटनेस एन्फ्लुएन्सर बनला. साहिल डिव्हाईन न्यूट्रिशन नावाची कंपनी चालवतो, जी फिटनेस सप्लिमेंट्स विकते.

साहिल खान अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्याने दुसऱ्या लग्नाचा खुलासा केला होता. अभिनेत्याने सांगितले की, त्याने मिलेना नावाच्या महिलेशी रशियामध्ये लग्न केले आहे. साहिल मिलेनापेक्षा 26 वर्षांनी मोठा आहे.

Sahil Khan
Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी एसटीएफने गुरुवारी मोठी कारवाई करत दोन गुन्हेगारांना अटक केली होती. यातील एक आरोपी हा दुबईत असलेल्या घोटाळ्याच्या सूत्रधाराचा चुलत भाऊ आहे, त्याला महादेव बुक गेमिंग कंपनीचे भारत प्रमुख बनवण्यात आले होते.

हजारो कोटींच्या फसवणुकीत वापरलेली सिम या दोन आरोपींनी दुबईला पाठवली होती. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विभूतीखंड पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. दोघांची सखोल चौकशी करण्यात आली. ज्यामध्ये अनेक मोठे खुलासे झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com