दीपक पायगुडे यांच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

लोकसेवा बॅंकेतील 32 कोटी रुपयांचा अपहार
पुणे - रिझर्व्ह बॅंक आणि सहकार आयुक्‍तालयाच्या नियमांचे उल्लंघन करीत अधिकारपदाचा गैरवापर करून 32 कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी लोकसेवा सहकारी बॅंकेचे चेअरमन दीपक पायगुडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक पिटके यांच्याविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सनदी लेखापाल कांताराम खंडुजी खिरड (वय 54, रा. शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली. तत्कालीन जिल्हा उपनिबंधक किरण सोनवणे यांनी 27 जून 2014 रोजी कांताराम खिरड यांना लोकसेवा सहकारी बॅंकेचे शासकीय लेखापरीक्षण करून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले होते. त्यानुसार खिरड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवार पेठेतील लोकसेवा बॅंकेचे सन 2013-14 चे लेखापरीक्षण केले.
लोकसेवा बॅंकेने नियमांचे उल्लंघन करून व्यवहार केल्याचे रिझर्व्ह बॅंकेतर्फे आणि कांताराम खिरड यांनी केलेल्या लेखापरीक्षणात निष्पन्न झाले. चेअरमन पायगुडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पिटके यांनी संचालक मंडळाला विश्‍वासात न घेता अनियमित कर्ज वितरित केले. पायगुडे यांनी त्यांच्या लोकसेवा प्रतिष्ठान आणि विनायक पिटके यांच्या हितसंबंधातील व्यक्तींच्या नावे रक्‍कम वर्ग केल्याचे समोर आले. त्यासाठी 42 बॅंक खात्यांचा वापर केल्याचे रिझर्व्ह बॅंकेच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने ही खाती बंद करण्याचे आदेश लोकसेवा बॅंकेला दिले होते. त्यानंतर ती खाती बंद करून नव्याने 18 कर्ज खाती उघडून त्यामार्फत 32 कोटींचा अपहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Web Title: crime on deepak paigude