बेकायदा विद्यार्थी वाहनांवर कारवाई

Crime
Crime

पुणे - शहरामध्ये अनेक वाहने शालेय विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक करीत असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) केलेल्या कारवाईत उघड झाले आहे. ‘आरटीओ’ने विशेष मोहिमेअंतर्गत १ ते १५ जुलैदरम्यान शहरात बेकायदा शालेय वाहतूक करणाऱ्या ६३ वाहनांवर कारवाई केली आहे.

शहरामध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने नियम धाब्यावर बसवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचबरोबर विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसलेल्या वाहनांतूनही विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचेही समोर आले आहे. ‘आरटीओ’ने केलेल्या कारवाईत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ५२ वाहनांवर नियम भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. तसेच, विद्यार्थी वाहतूक परवाना नसलेल्या ११ खासगी व्हॅनवर कारवाई करण्यात आली आहे. 
या विशेष मोहिमेत ९ लाख १० हजारांचा दंड व कर वसूल करण्यात आला आहे.

यात ३ लाख ७९ हजार २०० रुपये दंड, तर ५ लाख ३० हजार ९३३ रुपयांचा शिल्लक कर वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती आरटीओकडून देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com