पीएमपी मार्गांवर अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

पुणे - पीएमपीच्या मार्गांवर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 226 वाहनांवर पीएमपी, वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संयुक्त पथकाने दंडात्मक कारवाई केली आहे. त्यात इन्फोसिस कंपनीसाठी प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका बसचाही समावेश आहे.

शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपीच्या मार्गांवर अवैध प्रवासी वाहतूक सुरू असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाला समजली होती. त्यानुसार वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून संयुक्त पथक स्थापन करण्यात आले. या पथकाने स्वारगेट, कात्रज, वारजे, डेक्कन, नगर रस्ता, विमाननगर, सिंहगड रस्ता, कोथरूड, कर्वेनगर, हडपसर रस्ता, वाकड रस्ता, हिंजवडी आदी मार्गांवर गेल्या पंधरा दिवसांपासून तपासणी सुरू केली. त्यात 226 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर 76 वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यात जीप, तवेरा, मारुती व्हॅन, सहा आसनी रिक्षा, टाटा मॅजिक रिक्षा, पॅगो रिक्षा आदी वाहनांचा समावेश आहे. तसेच स्वारगेट ते वारजे माळवाडी या मार्गावर पन्नास प्रवाशांची वाहतूक करीत असताना एक बस पथकाला आढळली. एरवी इन्फोसिस कंपनीच्या कर्मचाऱ्यांची वाहतूक या बसमार्फत होते. संयुक्त पथकाने बस जप्त केली आहे. संबंधित बसचालकावर खटला दाखल करण्यात आला आहे, असे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले.

Web Title: crime on illegal transport on pmp route