esakal | बारामती पोलिसांनी शिताफीने मिळविले चोरीचे 41 मोबाईल परत
sakal

बोलून बातमी शोधा

The crime investigation team of the city police station in Baramati has taken action against the person carrying marijuana along with mobile theft.jpg

शहर पोलिसांनी तीन स्वतंत्र कारवाया करुन चोरीचे मोबाईल, गांजा चोरुन विकणारे व चंदन चोरी करणा-यांना गजाआड केले आहे. 

बारामती पोलिसांनी शिताफीने मिळविले चोरीचे 41 मोबाईल परत

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती :  येथील शहर पोलिसांनी तीन स्वतंत्र कारवाया करुन चोरीचे मोबाईल, गांजा चोरुन विकणारे व चंदन चोरी करणा-यांना गजाआड केले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत या बाबत माहिती दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मारवाड पेठेतील निरंजन दिलीप पारख यांच्या मोबाईलच्या दुकानातून चोरुन नेलेले 3 लाख 44 हजारांचे 41 मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. बालाजी उर्फ बाल्या अनिल माने (रा. कैकाडगल्ली, बारामती) याला पोलिस कर्मचारी अकबर शेख यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याचे साथीदार आतिफ नजामुद्दीन तांबोळी (रा.चिमणशा मळा, बारामती), साहिल अय्याज शकीलकर, रा. जामदार रोड कसबा, बारामती, प्रतिक दिलीप रेडे (रा. बाबर गल्ली, बारामती), अनिकेत गायकवाड (पूर्ण नाव नाही, रा. बारामती), सलमान बागवान (रा. कचेरी रोड, बारामती- पूर्ण नाव नाही) यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने ही चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून सर्व 41 मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. यापैकी साहिल शकीलकर, सलमान बागवान हे फरारी असून पोलिस त्यांचा शोध घेत असून उर्वरित सर्वांना अटक झाली आहे. 

हे ही वाचा : लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही बाजारपेठेतील ग्राहकांचा उत्साह कायम

दुस-या कारवाईत तांदुळवाडी रस्त्यावरील चंदनाचे झाड चोरुन नेणा-या सचिन नवनाथ शिंदे (रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती) यास ताब्यात घेण्यात आले. यात चंदनाची लाकडे व झायलो गाडी जप्त केली गेली. 

तिस-या कारवाईत बेकायदा गांजा बाळगल्या प्रकरणी अमित अनिल धेंडे (रा. सिध्दार्थनगर, आमराई, बारामती) याला 610 ग्रॅम मादक पदार्थ गांजासह ताब्यात घेण्यात आले आहे.

हे ही वाचा : विनाअनुदानित शाळांवर काम करणारे हजारो शिक्षकांना गेल्या अठरा-वीसवर्षांपासून अधिक काळ पगाराविना
 
पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे, सहायक पोलिस निरिक्षक सचिन शिंदे, मुकुंद पालवे, अश्विनी शेंडगे, सहायक फौजदार संदीपान माळी, पोलिस हवालदार अनिल सातपुते, पोलिस नाईक तात्यासाहेब खाडे, रुपेश साळुंखे, रामदास जाधव, दादासाहेब डोईफोडे, पांडुरंग गोरवे, ओंकार सिताप, पोलिस कर्मचारी सुहास लाटणे, दशरथ इंगवले, बंडू कोठे, योगेश कुलकर्णी, अजित राऊत, अतुल जाधव, नाथसाहेब जगताप, उमेश गायकवाड यांनी ही कामगिरी केली. 


संपादन - सुस्मिता वडतिले