गुंडाने मुलीला पळविले, पोलिसांना कळविले; पण...

Robbery Incidence In Renuka Temple Ramrahimnagar Sangli
Robbery Incidence In Renuka Temple Ramrahimnagar Sangli

पुणे - नारायण पेठेतील एका तरुणीला सराईत गुन्हेगाराने पळवून नेल्याचा गुन्हा १५ दिवसांपूर्वी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल झाला. पण तपासात प्रगती न झाल्यामुळे त्रस्त झालेल्या त्या तरुणीच्या वडिलांचा अखेर हृदयविकाराने रविवारी सकाळी मृत्यू झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोरोनामुळे दोन दिवसांपूर्वी फरासखाना इमारतीत त्यांना भेटण्यास नकार दिला होता. तरुणीला पळविणाऱ्या आरोपीची माहिती देऊनही पोलिसांनी तपास केला नाही, असे त्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

नीलेश देशपांडे (वय ४५, रा. नारायण पेठ) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. त्यांच्या १७ वर्षांच्या मुलीला अज्ञात आरोपीने फूस लावून पळवून नेले, असा गुन्हा दाखल आहे. मुलीचा शोध घ्यावा म्हणून देशपांडे कुटुंबीय गेले दोन दिवस पोलिसांकडे पाठपुरावा करीत होते; पण पोलिसांनी दाद न दिल्याने देशपांडे यांचा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली. आरोपींना दहा दिवसांत अटक करण्याचे लेखी आश्‍वासन विश्रामबाग पोलिसांनी दिल्यावर देशपांडे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार झाले.

Robbery Incidence In Renuka Temple Ramrahimnagar Sangli
पुणे : आज १११ ठिकाणी लसीकरण; ८० टक्के लस दुसऱ्या डोससाठी राखीव

पंधरा दिवसांनंतरही मुलगी सापडत नसल्यामुळे नीलेश देशपांडे हे पोलिस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांना भेटण्यासाठी शनिवारी फरासखाना पोलिस ठाण्याच्या इमारतीत गेले. मात्र कोविडमुळे त्या भेटणार नाहीत, असे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. अखेर देशपांडे यांनी गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांना भेटण्याचे ठरविले. शनिवार- रविवारी सुटी असल्यामुळे ते सोमवारी भेटतील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यांना देण्यासाठी देशपांडे यांनी शनिवारी अर्ज तयार केला. मात्र, मानसिक तणावात असलेल्या देशपांडे यांचा रविवारी मृत्यू झाला.

‘‘पोलिसांनी वेळीच आरोपींना पकडले असते, तर आमच्या कुटुंब प्रमुखाचा जीव वाचला असता; परंतु पोलिसांनी गंभीर प्रकार असूनही त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच आज आमच्यावर ही वेळ आली,’’ असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला.

Robbery Incidence In Renuka Temple Ramrahimnagar Sangli
काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! दौंडजजवळ मोठा अनर्थ टळला

पोलिसांना सर्व माहिती देऊनही..

देशपांडे यांची १७ वर्षांची मुलगी जवळच्याच ब्युटी पार्लरमध्ये काम करीत होती. २४ एप्रिलपासून ती गायब आहे. याबाबत त्यांची पत्नी सोनी (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे. देशपांडे व त्यांच्या मित्रांनी सगळीकडे मुलीचा शोध घेतला. दुसऱ्या दिवशी नारायण पेठ परिसरात राहणाऱ्या व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एकाने तिला पळवून नेल्याचे त्यांना समजले. त्यांनी सगळी माहिती पोलिसांना दिली. नऱ्हे येथील मानाजीनगर परिसरातील एका सराईत गुन्हेगाराच्या घरात त्या मुलीला एक रात्र ठेवण्यात आल्याचे देशपांडे यांना समजले. त्यांनी ती माहिती, संबंधित वाहनाचा क्रमांक आदी माहिती पोलिसांना दिली. तसेच त्यांना मदत करणाऱ्याचाही तपशील पोलिसांना दिला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपींचे मोबाईल लोकेशन तपासण्यात आले. हडपसर, कात्रज, धायरी या भागात चौकशी सुरू आहे. काही पोलिस पथके त्यांच्या मागावर आहेत. लवकरच आरोपीला अटक करू. -विजय टिकोळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विश्रामबाग पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com