esakal | काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! दौंडजजवळ मोठा अनर्थ टळला
sakal

बोलून बातमी शोधा

Railway line

घटनेचा गैरफायदा घेत पुण्यात सोडण्यासाठी जीपचालकांनी माणशी पाचशे रुपये घेत त्यांची लूट केली.

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! दौंडजजवळ मोठा अनर्थ टळला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाल्हे : पुणे-मिरज रेल्वे मार्गाच्या (Railway line) रुंदीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या कामादरम्यान दौंडज रेल्वे स्टेशनजवळ (Daundaj Railway Station) एका ठिकाणी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी लोहमार्गाखाली खोदकाम करून सिमेंटचे पाइप बसविण्यात आले होते. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास की मॅन विनायक पाटील लोहमार्गाची तपासणी करीत जात असताना दौंडज रेल्वे स्थानकानजीक मातीचा भराव खचल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी दौंडज स्थानक प्रमुखास कळविल्याने पुढील अनर्थ टळला. (soil under the railway track was eroded near Daundaj)

हेही वाचा: मोठी बातमी : राज्यातील दीड लाख बालकांना कोरोना

लोहमार्गाच्या रुंदीकरणादम्यान जुनी मोरी तोडून त्याठिकाणी सिमेंटचे पाइप टाकून बुजविण्यात आले होते. मात्र, भराव खचल्याचे समजल्यानंतर रेल्वेच्या घोरपडी विभागाचे वरिष्ट विभागीय अभियंता विजय कापगते यांना कळवले. कापगते यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून दोन्ही बाजूने येणाऱ्या रेल्वे गाड्या वाल्हे आणि जेजुरी स्थानकामध्ये थांबविण्याचे आदेश दिले. त्यानंतर युद्धपातळीवर पोकलेन, जेसीबी आणि कामगारांच्या मदतीने घटनास्थळावरील लोहमार्गाखाली मजबुतीकरण केले. अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास या मार्गावरून मुंबईकडे जाणारी पहिली प्रवासी रेल्वे गाडी मार्गस्थ केल्याची माहिती कापगते यांनी दिली.

दरम्यान, घटनेचा गैरफायदा घेत पुण्यात सोडण्यासाठी जीपचालकांनी माणशी पाचशे रुपये घेत त्यांची लूट केली.

पुणे जिल्ह्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

loading image