पोलिस भरती करण्याच्या बहाण्याने तोतया पोलिसाकडून फसवणूक

वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
crime news Fraud by fake police pretext of recruiting as police pune
crime news Fraud by fake police pretext of recruiting as police puneesakal

पुणे : शहर पोलिस दलात अनुकंपातत्त्वावर पोलीस दलात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका तोतया पोलिसाने अनेक तरुणांची फसवणूक केल्याची घटना पुढे आली आहे. उमेदवारांकडून पैसे घेऊन तोतया पोलिस पसार झाला. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिन्मय मोहन देवकाते (रा.म्हाडा,सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी विकी अनिलराव मुळे (वय 26, रा. हिंगणे होम कॉलनी , कर्वेनगर ) यांनी वारजे माळवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 23 एप्रिल ते 28 मे या कालावधीमध्ये हिंगणे येथे घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी हा त्याच्या तीन मित्रांसह हिंगणे होम कॉलनीत राहतो.

त्याच्याशी चिन्मय देवकाते याची ओळख झाली. त्यावेळी चिन्मयने त्यांना तो पोलिस असल्याची बतावणी करुन त्यांच्या खोलीवर राहण्यास आला. तो त्यांच्यासमोर नेहमी पोलिसांच्या गणवेशात फिरत असे. दरम्यान, त्याने पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपले चांगले संबंध असून त्यांना पैसे देऊन आपण अनुकंपातत्वावर नोकरीला लावून देतो, असे त्याने फिर्यादी व त्यांच्या मित्रांना सांगितले. त्यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला. त्यानंतर पाच जणांनी त्यास नोकरीला लावून देण्यासाठी एक लाख रुपयांहून अधिक रक्कम दिली. त्यानंतर त्यांनी बरेच दिवस त्याच्याकडे विचारणा केली, मात्र तो त्यांना टाळत असे. त्यामुळे फिर्यादी व त्याच्या मित्रांचा चिन्मयवरील संशय वाढला. चिन्मयच्याही हि बाब लक्षात आली. त्यानंतर फिर्यादी व त्यांचे मित्र बाहेर गेल्यानंतर तो त्यांचे मोबाईल, लॅपटॉप घेऊन पसार झाला. याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर त्याचा पोलिसांकडून त्याचा शोध सुरु करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com