Crime News : दुबईला साखर निर्यातीच्या बहाण्याने दीड कोटींची फसवणूक; आरोपी पुण्यातील डॉक्टर

Pune Crime news
Pune Crime news esakal

Pune Crime news : दुबई येथे साखर निर्यातीसाठी दहा टक्के अ‍ॅडव्हान्स घेऊन साखर निर्यात न करता पुण्यातील एका डॉक्टरने मुंबईच्या एका व्यावसायिकाची एक कोटी ५७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Pune Crime news
Pune News : जिल्हा बँकेची नोकर भरती दोन वर्षापासून ‘जैसे थे’; ३२ हजार जणांना भरतीची प्रतीक्षा

या संदर्भात हसन अली पुरोहित (वय ६२, रा. ओशिवरा पश्चिम, अंधेरी, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून डॉ. उमेश कृष्ण जोशी (वय ६३, रा. रामकांता अपार्टमेंट, डहाणूकर कॉलनी) याच्याविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. उमेश जोशी याची ओरा एंटरप्रायझेस ही कंपनी सदाशिव पेठेत आहे. फिर्यादी यांना दुबई येथे ५ हजार १८४ टन साखर निर्यात करायची होती. त्यासाठी जोशी याने पुरोहित यांच्याकडे दहा टक्के अ‍ॅडव्हान्स मागितले.

त्यामुळे पुरोहित यांनी एक कोटी ३८ लाख ८४ हजार ८२६ रुपये (एक लाख ८६ हजार ६२४ अमेरिकन डॉलर) जोशी यांच्या खात्यात ऑनलाइन जमा केले. परंतु साखरेची निर्यात न करता फिर्यादीची फसवणूक केली. (Marathi Tajya Batmya)

Pune Crime news
Bakrid : बोकडाच्या अंगावर 'अल्लाह' अन् 'मोहम्मद'! किंमत सव्वा कोटी; विक्रीच्या पैशातून बांधणार शाळा

तसेच, महेश पगडे यांना १० कोटींचे कर्ज देतो, असे सांगून त्यांच्याकडून ५० लाख रुपये घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे युनिट एकचे पोलिस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com