मुलगी माझी नाही म्हणत केली चिमुकलीची हत्या; पसार बापाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News, man killed daughter,Police Arrested
Crime News, man killed daughter,Police Arrested

इंदापूर : शेतात तोडलेल्या ऊसाच्या मोळ्या बांधायला पत्नी न आल्याने पतीने त्याचा राग पोटच्या 2 वर्षाच्या पिला या मुलीवर काढून तिची हत्या केल्याचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे.  22 नोव्हेंबर 2020 घडलेल्या या घटनेप्रकरणी सोनम यांनी  17 डिसेंबर रोजी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी सकट्या उर्फ चिंटु उर्फ शक्ती उर्फ शक्तिमान विकास काळे ( रा. भांबुरे, ता. कर्जत, जि. नगर ) या फरारी बापास अटक केली. 

मौजे वरकुटे बुद्रुक - करेवाडी (ता. इंदापूर ) येथील एकनाथ धोंडीबा करे यांच्या शेतात आरोपी पत्नी सोनम सह ऊस मजूर म्हणून कामाला होता. 22 नोव्हेंबर रोजी दिवस भर ऊसतोड करून रात्री कोपीवर आल्यावर आरोपीने सोनम हिला ही मुलगी माझी नाही, तू माझ्या मागे ऊस तोडायला का आली नाही म्हणत पत्नीस लाथाबुक्यानी मारहाण करून धारधार कोयता हातात घेवून दहशत निर्माण केली. त्यानंतर पहाटे दोन्ही हाताने मुलीचे नाक व तोंड दाबून तिचा खून करून  सकट्या अंधाराचा फायदा घेवून फरार झाला.   

पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख,अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर,इंदापूर पोलीस निरिक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक अजित जाधव,दिपकपालखे , अमित चव्हाण, प्रविण शिंगाडे, विनोद काळे, मामा चौधर, गजेंद्र बिरलिंगे, विठ्ठल नलवडे, विक्रम जमादार, विनोद मोरे या पथकाने आरोपीला अटक केली. महिला पोलीस उपनिरिक्षक सिमा मुंडे पुढील तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com