...आणि पुणे पोलिसांनी 'स्टंटमॅन' आरोपीचा स्टंट हाणून पाडला!

 Crime News, Pune, Pune Police,robbery
Crime News, Pune, Pune Police,robbery

पुणे : ड्रायव्हिंग शिकणाऱ्या संगणक अभियंता तरुणीचे हात बांधून कटरच्या सहाय्याने तिच्या बोटातील अंगठ्या काढून घेत तिला लुटणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्लीतुन अटक केली. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी एनआयबीएम रस्ता परिसरामध्ये घडला होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपींचा दिल्लीपर्यंत पाठलाग करीत त्यांना बेड्या ठोकल्या. 

राजेशसिंग माही (वय 39, रा मेरठ, उत्तर प्रदेश), कृष्णराम बहादूर राणा (वणय 30, रा. महिपालपुर, दिल्ली) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.  गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरू येथील नामावंत सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणारी 35 वर्षीय तरुणी साळुंके विहार परिसरात राहणाऱ्या तिच्या आई-वडीलांकडे राहण्यासाठी आली होती. तिचे वडील लष्करातील निवृत्त अधिकारी आहेत. तरुणी मागील आठ दिवसांपासून कार चालविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या राजेशसिंग माही याच्याकडे कार शिकत होती. दरम्यान, मंगळवारी सकाळी त्याचा मित्र राणासमवेत फिर्यादीच्या घरी गेला. त्यावेळी त्याने मित्राच्या फियाट कारवर ड्रायव्हिंग शिकवायचे असल्याचे फिर्यादीस सांगितले.

त्यानंतर तो फिर्यादी तरुणीला गाडीमध्ये बसवून उंड्री परिसरात कार घेऊन गेला. फिर्यादी या कार चालवित होत्या. मात्र चढ आल्यानंतर माहीने तरुणीला बाजुच्या सीटवर बसविले. त्यावेळी मागे बसलेल्या राणाने तरुणीच्या तोंडात कापसाचा बोळा घातला. दोरीने तिचे हात बांधले. त्यानंतर कटरच्या सहाय्याने फिर्यादीच्या हातातील चार अंगठ्या कापून घेतल्या. त्याने उंड्रीपासून एनआयबीएम रस्ता परिसरात येईपर्यंत फिर्यादीच्या गुगल पेवरुन 40 हजार रुपये स्वतःकडे घेतले. त्याचबरोबर फिर्यादीच्या घराची चावी घेऊन एटीएम कार्ड घेत एटीएममधून दहा हजार रुपये काढले. असा एकूण पावणे दोन लाखांचा ऐवज घेऊन दोघे पळून गेले. त्यानंतर फिर्यादीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 


..आणि पोलिसांनी 'स्टंटमॅन' आरोपीचा स्टंट हाणून पाडला !

कोंढवा पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलिस आरोपींच्या मागावर होते.   
दरम्यान, या प्रकरणाचा गुन्हे शाखेच्या युनीट पाचच्या पथकाकडून समांतर तपास सुरू होतो. तांत्रिक तपास केल्यानंतर आरोपी ओला कॅबने मुंबईला व तेथून दिल्लीला विमानाने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनीही विमानानेच दिल्ली गाठून दोघांना अटक केली. माही हा ड्रायव्हिंग प्रशिक्षक असण्याबरोबरच चित्रपटांमध्ये स्टंटमॅन म्हणूनही काम करतो. मात्र अवघ्या काही तासाताच पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन बेड्या ठोकत त्याचा स्टंट हाणून पाडला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com