पिसोळीतील २२ वर्षांच्या तरुणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार...

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद ; व्हीडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी
crime news rape lure of marriage abortion threst of viral video pune
crime news rape lure of marriage abortion threst of viral video pune esakal

पुणे : लग्नाचे आमिषाने तरुणीवर बलात्कार केला. या प्रकारातून ती गर्भवती राहिल्याने तिचा गर्भपात करण्यास लावून लग्नासाठी जबरदस्ती केली आणि अश्लील व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यावर भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नवले पुलाजवळील ओयो हॉटेल, वाघोली येथे २० नोव्हेबर २०११ ते ४ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडला. याप्रकरणी पिसोळी येथील २२ वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दीपककुमार चौधरी जैस्वाल (रा. पिसोळी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी दीपककुमार याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन या तरुणीबरोबर शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ही तरुणी गर्भवती राहिल्यावर तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर फिर्यादीने लग्नासाठी जबरदस्ती केली तर तिचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीमुळे फिर्यादी या घाबरुन गेल्या होत्या. शेवटी त्यांनी पोलिसांकडे संपर्क साधून तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक घोगरे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com