लोहगाव येथे "सीआयएसएफ'च्या जवान महिलेसह दोघांची आत्महत्या

विमानतळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद
crime news Suicide of two persons including young woman of CISF Lohgaon pune
crime news Suicide of two persons including young woman of CISF Lohgaon punesakal

पुणे : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (सीआयएसएफ) जवान महिलेसह दोघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हि घटना सोमवारी (ता.6) रोजी लोहगाव परिसरातील सीआयएसएफच्या वसाहतीत घडली आहे. दोघांच्याही आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.अस्मिता दास (वय 30, मूळ रा. ओडीसा), संजय कुमार (वय 30, मूळ रा. उत्तरप्रदेश) अशी आत्महत्या केलेल्या जवानांची नावे आहेत. विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मिता दास व संजय कुमार हे दोघेही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात नियुक्तीस होते.

"सीआयएसएफ'वर लोहगाव विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. दास या विवाहीत असून त्यांचे पती गुहावटी येथे नोकरीला आहेत. त्यांना एक मुलगाही आहे. तर संजय कुमार हे अविवाहीत होते. दोघेही वेगवेगळ्या इमारतींमध्ये राहण्यास होते. सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अस्मिता दास यांनी, तर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास संजय कुमार यांनी ते वसाहतीतील त्यांच्या वेगवेगळ्या घरांमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विमानतळ पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पथकाकडे लोहगाव विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com