Crime | बारामतीत पुन्हा एकदा वेश्याव्यवसायावर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime news
बारामतीत पुन्हा एकदा वेश्याव्यवसायावर कारवाई

बारामतीत पुन्हा एकदा वेश्याव्यवसायावर कारवाई

sakal_logo
By
मिलिंद संगई,

बारामती - शहरातील वेश्याव्यवसायाविरोधात शहर पोलिसांनी मोहिम हाती घेतली आहे. आज चिमणशहा मळा परिसरातील एका लॉजवरील वेश्या व्यवसायातील दलाल महिलेला पोलिसांनी अटक करत एका 22 वर्षीय महिलेची सुटका करण्यात आली. ही दलाल महिला रुई परिसरातील बयाजीनगर येथे वास्तव्यास असल्याचे पोलिसांनी सांगितले.

उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना या बाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिस निरिक्षक सुनील महाडीक यांना कारवाईचे आदेश दिले होते. संबंधित लॉजवर एक महिला दुस-या एका महिलेकडून हा व्यवसाय करुन घेत होती. त्या नंतर पोलिसांनी सरकारी दवाखान्यासमोर असलेल्या चिमणशहा मळा परिसरातील एका लॉजवर धाड टाकत ही कारवाई केली.

हेही वाचा: बारामती : हातभट्टीच्या कारवाईदरम्यान एकाचा पाण्यात बुडून मृत्यू

पोलिस हवालदार अमृता भोईटे यांनी या बाबत फिर्याद दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वीच गणेश मार्केट परिसरातील वेश्याव्यवसायावर शहर पोलिसांनी कारवाई केली होती. त्या वेळेसही दोन महिलांची सुटका करण्यात आली होती. या दोन्ही घटनांमध्ये बाहेरगावात राहणा-या महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून महिलाच वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे उघड झाले. गुरुवारी (ता. 25) केलेल्या कारवाईत सुनील महाडीक यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे यांच्यासह पोलिस कर्मचारी पवार, राऊत, लता हिंगणे, राहुल लाळगे आदींनी या कारवाईत भाग घेतला.

पोलिस हवालदार अमृता भोईटे यांनी याबाबत फिर्याद दिली. चिमनशहा मळा परिसरात दोन महिला वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यानुसार बोगस ग्राहक पाठवून शहानिशा करण्याचे आदेश महाडीक यांनी दिले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रकमेसह मोबाईल जप्त केला. दलाल महिलेवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत तिला अटक केली.

loading image
go to top