Baramati : हातभट्टीच्या कारवाईदरम्यान एकाचा पाण्यात बुडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती : हातभट्टीच्या कारवाईदरम्यान एकाचा पाण्यात बुडून मृत्यू
बारामती : हातभट्टीच्या कारवाईदरम्यान एकाचा पाण्यात बुडून मृत्यू

बारामती : हातभट्टीच्या कारवाईदरम्यान एकाचा पाण्यात बुडून मृत्यू

sakal_logo
By
- मिलिंद संगई

बारामती - तालुक्यातील सोनगावनजिक हातभट्टीच्या अड्डयावर छापा मारण्यास गेलेल्या पोलिस पथकाच्या हातातून सुटून जाण्याचा प्रयत्न करताना एकाचा आज नीरा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. या बाबत परस्परविरोधी आरोप होत असून या घटनेनंतर जमावाने केलेल्या मारहाणीत उपविभागीय पोलिस अधिका-यांच्या पथकातील चार पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगलेश अशोक भोसले (वय 45, रा. सोनगाव, बारामती) यांचा यात मृत्यू झाला आहे.

या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती तालुक्यातील दारु व्यवसायाविरुध्द पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला होता. तालुक्यात ठिकठिकाणी सुरु असलेल्या हातभट्टीच्या दारु व्यवसायाच्या विरोधात पोलिसांनी तीव्र कारवाई सुरु केली होती. या अंतर्गत आज दुपारी एकच्या सुमारास सोनगाव परिसरात नीरा नदीच्या काठावर हातभट्टीची दारु तयार करायचे काम सुरु असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली.

हेही वाचा: शिवसेना म्हणजे मागासवर्गीयांवर अन्याय करणारी सेना; सुधाकर भालेराव

त्यानंतर या वर कारवाई करण्यासाठी पथक पोहोचले तेव्हा पोलिसांची चाहूल लागताच दोघांनी पळ काढला व भीतीने नीरा नदीच्या पाण्यात उड्या मारल्या. या पैकी एक जण पोहून पलिकडे पोहोचला मात्र दुस-या व्यक्तीला दम लागल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर तेथे जमा झालेल्या संतप्त जमावाने पोलिसांना मारहाण केली, यात पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहेत. दरम्यान पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी पोहोचली असून परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी सांगितले.

loading image
go to top