प्लॅस्टिक विक्री करणाऱ्यांवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

पुणे - राज्यात बंदी असलेल्या प्लॅस्टिकची सर्रास विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने (एमपीसीबी) संयुक्त कारवाई केली. लक्ष्मी रस्ता, मंडई परिसर, तुळशीबाग, शुक्रवार पेठ, बोहरे आळी, रविवार पेठ परिसरातील ८० दुकानांची तपासणी करण्यात आली. या वेळी ८ दुकानांमध्ये बंदी घातलेल्या प्लॅस्टिक वस्तू; तसेच कॅरिबॅग, प्लॅस्टिक चमचे, ग्लास अशा वस्तू आढळल्या, अशी माहिती ‘एमपीसीबी’च्या पुणे प्रादेशिक अधिकारी हेरंबप्रसाद गंधे यांनी दिली.

बंदी असलेले प्लॅस्टिक वापरणाऱ्यांना ४० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्याच वेळी तुळशीबाग येथील व्यापाऱ्यांना प्लॅस्टिकबंदीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड परिसरात केलेल्या २५ पैकी सात ठिकाणी प्लॅस्टिक सापडले. या व्यापाऱ्यांना ४५ हजार दंड ठोठावण्यात आला.

त्यांच्याकडून सुमारे सहा टन बंदी घालण्यात आलेले प्लॅस्टिक आणि इतर वस्तू जप्त केल्या, असेही त्यांनी सांगितले.  ‘एमपीसीबी’चे सहसंचालक सोनटक्के (जल), क्षेत्र अधिकारी डॉ. अरविंद धपाटे व सर्जेराव भोई, पुणे महापालिकेचे सहायक आयुक्त वैभव कडलख, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान व आरोग्य निरीक्षक राजेश रासकर, शाहू पोकळे, उमेश देवकर, अमोल पवार, संतोष कदम, संदीप नागवडे, भूषण सांगळे हे कारवाईत सहभागी झाले होते.

Web Title: Crime on Plastic Sailer