crime Two arrested for stealing two wheelers pune
crime Two arrested for stealing two wheelers punesakal

दुचाकी चोरी करणाऱ्या परराज्यातील दोघांना अटक

कर्नाटक येथील दोन चोरट्यांकडून गुन्‍हे शाखेच्‍या दरोडा व वाहनचोरी पथकाने चोरीच्या ११ दुचाकी जप्‍त केल्या

पुणे : कर्नाटक येथील दोन चोरट्यांकडून गुन्‍हे शाखेच्‍या दरोडा व वाहनचोरी पथकाने चोरीच्या ११ दुचाकी जप्‍त केल्या. पथकाने दोघांना अटक केली आहे. आरोपी पुण्यात चोरी केलेली दुचाकी कर्नाटक येथे नेऊन विकत असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे.गणेश हुच्चप्पा गुडळी (रा. गुडळी, कर्नाटक) आणि लोहीत राहुल काळे (रा. बंखलकी, कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्‍या दोघांची नावे आहेत. जप्त करण्यात आलेल्यांमध्ये सिंहगड पोलिस ठाण्याच्‍या हद्दीतून पाच, दत्‍तवाडी पोलिस ठाण्याच्‍या हद्दीतून दोन तर विश्रामबाग आणि वानवडी येथील एका वाहनाचा समावेश आहे.

सिंहगड पोलिस ठाण्याच्‍या हद्दीतील वाहन चोरीच्या गुन्‍ह्यांना आळा घालण्यासाठी, वाहनचोरांचा शोध दरोडा व वाहनचोरी पथक एककडून सुरू होता. दरम्‍यान गुन्‍ह्यातील कर्नाटक येथील आरोपी गणेश गुंडळी हा हिंगणे येथे वाहन चोरी करण्यासाठी येणार असल्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांच्‍या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शुभांगी नरके, अंमलदार श्रीकांत दगडे, नीलेश शिवतरे, सुमीत ताकपिरे, मॅगी जाधव यांनी गुडळी आणि काळे या दोघांना ताब्या घेतले असता त्‍यांच्‍याकडून अकरा दुचाकी जप्‍त करण्यात आल्या. दोघांना पुढील कार्यवाहीसाठी सिंहगड रोड पोलिसांच्‍या हवाली करण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी कर्नाटकातील सरार्इत वाहनचोर आहेत. दोघेही एका दुचाकीवर फिरून शहरात दुचाकी चोरायचे त्‍या दुचाकी कर्नाटक येथे नेऊन विकण्याचे. त्‍यांच्‍याकडून सिंहगड रोड परिसरातून चोरलेली एक दुचाकी सुरवातीला जप्‍त करण्यात आली. नंतर कर्नाटक येथून पाच दुचाकी जप्‍त करण्यात आल्‍या. तर काही दुचाकी त्‍यांनी पेट्रोल संपल्‍यानंतर सोडून दिल्‍या होत्‍या त्‍या दुचाकीही जप्‍त करण्यात आल्‍या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com