अत्याचाराचे गुन्हे ‘वूमन अ‍ॅट्रॉसिटी’ म्हणून दाखल करून घ्यावेत : चित्रा वाघ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chitra wagh

अत्याचाराचे गुन्हे ‘वूमन अ‍ॅट्रॉसिटी’ म्हणून दाखल करून घ्यावेत : चित्रा वाघ

पुणे : बलात्काराच्या गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी अनेक प्रकरणात केली जाते. मात्र, प्रत्यक्षात त्या सुनावणीचा किती उपयोग होतो, हा प्रश्नच आहे. त्यामुळे अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपींना कठोर आणि लवकर शिक्षा मिळावी यासाठी महिला अत्याचाराचे निवडक गुन्हे ‘वूमन अ‍ॅट्रॉसिटी’ म्हणून दाखल करून घ्यावेत. महिला अत्याचाराचे गुन्हे त्यानुसार चालविण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी बुधवारी (ता. ८) केली.

रेल्वे स्थानकातून अल्पवयीन मुलीला मदतीच्या बहाण्याने बाहेर नेऊन तिच्या १३ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आला आहे. या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर वाघ यांनी बुधवारी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन संबंधित मुलीस न्याय मिळवून देण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अ‍ॅट्रॉसिटीमुळे आरोपींना जामीन मिळण्यापासून मुदतीत निकाल लावण्यापर्यंतची वेळ निश्चित केली जार्इल. त्यातूनच महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांना चाप बसेल, अशी शक्यता वाघ यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: मुंबई : पोलीसांनी वृद्धेला साडी, चोळी देऊन केले मुलांच्या हवाली

त्यावेळी तत्परता का दाखवली नाही ?

पुणे पोलिसांनी या गुन्‍ह्यात केलेल्या तपासाचे वाघ यांनी कौतुक. मात्र पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी अशीच तत्परता दाखवली असती, तर काय झाले असते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, पुणे पोलिसांना ‘ते’ प्रकरणी तडीस न्यायचेच नव्हते. त्यामुळेच अजूनही त्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असा आरोपही वाघ यांनी केला.

तिने त्याला झोडून काढले पाहिजे होते

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याने लोणी काळभोर येथील महिला सरपंचाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याबाबत वाघ यांना विचारले असता त्या म्हणाल्या, “हे व्हिडिओ तुकड्या तुकड्यात का दाखवले जात आहे. खरे खोटे करायचे असेल, तर पूर्ण व्हिडिओ समोर आला पाहिजे. त्या कार्यकर्त्याने महिलेच्या अंगावर हात उचलला. त्यावर महिलेने गप्प का बसावे. तिने त्याला झोडून काढले पाहिजे होते. उपमुख्यमंत्री अजित पवार अशा घटनांना थारा देणार नाहीत.

टॅग्स :Pune NewsChitra Wagh