35 व्या वर्षी केला गुन्हा आणि 55 व्या वर्षी सापडला

Crime
Crime

पुणे - आरोपीने वयाच्या 35 व्या वर्षी नागरीकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची दिड लाख रुपयांची फसवणूक केली. त्यानंतर आरोपीने भारतभर दौरा करुन लोकांना फसविण्याचा कार्यक्रम सुरूच ठेवला. मात्र आई आजारी असल्यामुळे तो तिला भेटण्यासाठी आला आणि तब्बल 19 वर्षांनी आणि तेही वयाच्या 55 व्या वर्षी पुणे पोलिसांच्या तावडीत सापडला. गुन्हा होता 19 वर्षांपुर्वीच्या दिड लाखाच्या फसवणुकीचा ! 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सतीश दशरथ हळदणकर (वय 55, रा. माहिम, मुंबई) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर याप्रकरणी प्रफुल्ल शंकर गायकवाड (वय 25, रा. कॅम्प) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी, त्यांच्या भावासह पाच जणांना हळदणकर याने 19 वर्षींपुर्वी मुंबईतील विमानतळावर सुरक्षारक्षक व लिपीक म्हणून कामाला लावतो असे सांगून, त्यांना नेमणूकीचे पत्र देत त्यांच्याकडून एक लाख 53 हजार रुपये उकळले होते. दरम्यान, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ.शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखालील फरारी व पाहीजे आरोपी शोध पथकाचे प्रमुख पोलिस हवालदार महेश निंबाळकर हे संबंधीत आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, निंबाळकर यांना हळदणकर हा त्याच्या आईला भेटण्यासाठी मुंबईला येणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार, निंबाळकर यांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने 19 वर्षांर्पुी केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याची कबुली दिली. 

'महालाभार्थी'द्वारे घेता येणार झेडपी योजनांचा घरबसल्या लाभ

तो लोकांना फसविण्यासाठी करत होता भारत दौरा ! 
हळदणकर याने विज्ञान शाखेतुन पदवी घेतली आहे. त्याने मुंबई, पुणे, नगर, नाशिक, सिंधुदुर्ग, औरंगाबाद येथे नागरीकांना फसविले. त्यानंतर त्याने दिल्ली, मध्यप्रदेश, गोवा, हैद्राबाद या ठिकाणी जाऊन भाड्याने घरे घेतली. तेथेच नागरीकांना मोठ्या सरकारी नोकरीचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढत असे. त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना दिल्ली येथे बोलावून बैठक घेते. त्यामध्ये त्यांना नियुक्तीचे पत्र देत असे. त्यानंतर तेथून दुसऱ्या शहरात पलायन करत असल्याची माहिती निंबाळकर यांनी दिली.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com