देहविक्रय करणाऱ्या महिलेच्या दिड वर्षांच्या मुलीस पळविणाऱ्यास पोलिसांकडून अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

देहविक्रय करणाऱ्या महिलेच्या अवघ्या दिड वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या विश्रामबाग पोलिसांनी मंगळवारी अटक केली. हा प्रकार रविवारी बुधवार पेठेमध्ये घडला होता.

पुणे - देहविक्रय करणाऱ्या महिलेच्या अवघ्या दिड वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या विश्रामबाग पोलिसांनी मंगळवारी अटक केली. हा प्रकार रविवारी बुधवार पेठेमध्ये घडला होता. 

याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियादी या बुधवार पेठेतील वेश्‍यावस्तीमध्ये देहविक्रय करतात. रविवारी दुपारी त्यांच्याकडे एक ग्राहक आला होता. त्यानंतर त्याने संबंधीत महिलेस एटीएममधून पैसे काढून देतो असे सांगितले. त्यामुळे फिर्यादी या देखील त्यांच्या दिड वर्षाच्या मुलीला बरोबर घेऊन त्याच्यासमवेत एटीएममध्ये गेल्या. फिर्यादी महिलेस पैसे दिल्यानंतर त्याने तिला दारु पिण्याचा आग्रह केला. त्यानंतर दोघांनीही एकत्र दारु प्राशन केली. त्यानंतर दोघांनी किबे लक्ष्मी चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहीला. चित्रपट संपल्यानंतर फिर्यादी महिला लघुशंकेसाठी गेल्या. जाताना त्यांची मुलगी त्यांनी संबंधीत व्यक्तीकडे सांभाळण्यासाठी दिली. त्या माघारी आल्यानंतर आरोपी मुलीला घेऊन पसार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी संपुर्ण परिसरात आरोपीचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. अखेर त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, विश्रामबाग पोलिसांनीही आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली होती.

तांत्रिक विश्‍लेषण केल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी आरोपीस ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक गीता पाटील करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: criminal arrested crime