अभिनेत्यांकडुन खंडणी उकळणाऱय़ा गुन्हेगारास अटक; अभिनेत्रीसह पीएसआयविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

पुणे : अभिनेत्रीने दाखल केलेला गुन्ह्यातून माघार घेण्यासाठी एका अभिनेत्यास पिस्तूलाचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडून 15 लाख रुपयांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका अभिनेत्रीसह चौघांविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. 

राम भरत जगदाळे (रा.पर्वती पायथा, सहकारनगर) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.  दहशतवाद विरोधी पथकामध्ये कार्यरत पोलिस उपनिरीक्षक अमोल टेकाले यांच्यासह अभिनेत्री व एका महिले विरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका अभिनेत्याने फिर्याद दिली आहे.

गुन्हे शाखेच्या यूनिट दोनचे पोलिस उपनिरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी हे अभिनेते असून त्यांनी संबंधित अभिनेत्रीसमवेत एका चित्रपटात काम केले आहे. दरम्यान, अभिनेत्रीने फिर्यादीविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. संबंधित गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी फिर्यादीने केली होती. हा प्रकार अभिनेत्रीने जगदाळे यास सांगितला. त्यावेळी जगदाळे याने त्याच्या सहकारनगर येथील कार्यालयामध्ये फिर्यादीस बोलावून घेतले. त्यानंतर त्यास डांबून ठेवले. त्यानंतर त्यास अभिनेत्रीच्या पाया पडायला लावले. त्याचे व्हिडीओ काढत तो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची आणि जिवे मारण्याची धमकी देत 15 लाख रुपये मागितले. त्यापैकी फिर्यादीकडूनपोलिस उपनिरीक्षक टेकाले याने 1 लाख रुपये घेतले. उर्वरीत रक्कम फिर्यादीने दिली नाही. त्यामुळे पुन्हा फिर्यादीस पिस्तूलाचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत व्हिडीओ सोशल मिड़ीयावर व्हायरल केला. 

Web Title: Criminal arrested for ransom from actor ; FIR filed against PSI and actress