शहरात गुन्हेगारी टोळ्या पुन्हा सक्रिय ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीतील गुन्हेगार स्वप्नील सुनील कुलकर्णी हा नुकताच पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून कार्बाईनसह पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली. कुख्यात नीलेश घायवळ टोळीतील गुन्हेगाराला पकडून त्याच्याकडून पिस्तूल जप्त केले. त्याने हे पिस्तूल कुलकर्णी याच्याकडून घेतल्याचे तपासात समोर आले. या घटनांवरून शहरात गुन्हेगारी टोळ्या पुन्हा सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. 

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीतील गुन्हेगार स्वप्नील सुनील कुलकर्णी हा नुकताच पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून कार्बाईनसह पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली. कुख्यात नीलेश घायवळ टोळीतील गुन्हेगाराला पकडून त्याच्याकडून पिस्तूल जप्त केले. त्याने हे पिस्तूल कुलकर्णी याच्याकडून घेतल्याचे तपासात समोर आले. या घटनांवरून शहरात गुन्हेगारी टोळ्या पुन्हा सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. 

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन हा सध्या दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बंद आहे. खून, अपहरण आणि खंडणी उकळल्याप्रकरणी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. परंतु छोटा राजन टोळीतील साथीदार अजूनही मुंबई-पुण्यात सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. सहकारनगर पोलिसांनी धनकवडी परिसरात स्वप्नील कुलकर्णी याला नुकतीच अटक केली. वरिष्ठ निरीक्षक दीपक निकम यांच्या पथकाने त्याला अटक केली. त्यापाठोपाठ गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कदम, शैलेश जगताप यांनी कुख्यात नीलेश घायवळ टोळीतील गुन्हेगार प्रशांत बाळासाहेब धुमाळ याला कॅंप परिसरात अटक केली. त्याने छोटा राजन टोळीतील कुलकर्णी याच्याकडून पिस्तूल घेतले होते. गुन्हे शाखेने पुन्हा त्याच्याकडे सखोल चौकशी केली. त्या वेळी त्याच्याकडे आणखी अग्निशस्त्र असल्याचे उघड झाले. कुख्यात गजा मारणे टोळीतील तडीपार गुंड अविनाश वसंत कडू याला संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक (दक्षिण) पथकाने मंगळवारी अटक केली. यावरून गुन्हेगारी टोळ्या छुप्या पद्धतीने कार्यरत आहेत, हे स्पष्ट होते. 

नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक (मोका) कायद्यानुसार कारवाईचा बडगा उगारला. शहरात निवडणुकीच्या कालावधीत काही अघटित घडते की काय, अशी शंका पोलिसांच्याही मनात होती. मात्र पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांमधील तीनशेहून अधिक गुन्हेगारांना मोका लावला. तसेच 30 सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. दहशत माजविणाऱ्या काही गुंडाना शहरातून तडीपार करण्यात आले. पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला आणि सहआयुक्‍त सुनील रामानंद यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिस दलाने ही कामगिरी बजावली. मात्र गुन्हेगारी टोळ्यांनी पुन्हा डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना तडीपार आणि सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. 

Web Title: Criminal gangs active in the city